Loading...

पुण्यात आहेत दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, जाणून घ्या कोणती?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे हे पुण्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम आहे. या स्टेडीयमवर आत्तापर्यंत केवळ आंतरराष्ट्रीय 7 सामने झाले आहेत. यामध्ये 4 वनडे, 2 टी20 आणि 1 कसोटी सामन्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व 7 सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. मात्र भारताला यातील 3 सामनेच जिंकता आले आहेत.

या स्टेडीयमवर पहिला सामना 20 डिसेंबर 2012ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला होता. हा टी20चा सामना होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या स्टेडीयमवर आयपीएलचेही अनेक सामने झाले आहेत.

गहुंजेच्या स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय सामने सुरु होण्याआधी पुण्यातील नेहरु स्टेडीयमवर नोव्हेंबर 2005 पर्यंत भारताचे आंतरराष्ट्रीय सामने होत होते.

नेहरु स्टेडीयमवर 11 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळवण्यात आले. यातील 8 सामन्यात भारतीय संघाचा समावेश होता. विशेष म्हणजे याच मैदानावर केनियाने 1996 च्या विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडीजचा पराभव केला होता.

क्लब ऑफ महाराष्ट्र नावानेही ओळखले जाणाऱ्या या स्टेडीयमवर पहिला सामना 5 डिसेंबर 1984 ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला होता. तसेच या स्टेडीयमवर शेवटचा सामना 3 नोव्हेंबर 2005ला भारत विरुद्ध श्रीलंका संघात झाला.

You might also like
Loading...