पुणे । टेक महिंद्रा आणि केपीआयटी संघाने प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत टेक महिंद्रा संघाने इन्फोसिस संघावर तीन गडी राखून मात केली. यात इन्फोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५९ धावा केल्या. यात पंकज जिंताने ३४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५, तर साईनाथ शिंदेने ४० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह ४६ धावा केल्या. यानंतर टेक महिंद्राने शेवटच्या चेंडूवर विजय साध्य केला. यात सचिन गिलबिलेने अखेरच्या तीन चेंडूंत ६, २, ४ धावा करून टेक महिंद्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या लढतीत केपीआयटी संघाने सायबेज संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. केपीआयटीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून सायबेज संघाला १९.५ षटकांत १२९ धावांत रोखले. यानंतर केपीआयटीने विजयी लक्ष्य १५.५ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
धावफलक : १) इन्फोसिस – २० षटकांत ५ बाद १५९ (साईनाथ शिंदे ४६, पंकज जिंता ४५, स्वप्नील थोरात २-२४, सचिन गिलबिले १-२८, हिमांशू गांधी १-२७) पराभूत वि. टेक महिंद्रा – २० षटकांत ७ बाद १६३ (सौरभ देवरे ६८, स्वप्नील थोरात ३०, सचिन गिलबिले नाबाद १२, सागर दुबे ३-२४, रवी थापलियल २-६).
२) सायबेज – १९.५ षटकांत सर्वबाद १२९ (निखिल गिरासे ३२, अफान शेख २१, मयुरेश लिखिते २-२०, निरंजन फडणविस २-३२, अंबर दंडगव्हाळ २-१९) पराभूत वि. केपीआयटी – १५.५ षटकांत ४ बाद १३१ (मयुरेश लिखिते नाबाद ३७, परिक्षीत किणी ४४, कमलेश सुर्वे २३, निखिल गिरासे १-२४).