---Advertisement---

या तारखेला पुण्यात होणार आंतरराष्ट्रीय टी२० सामना, असे असणार तिकीट दर

On: सोमवार, डिसेंबर 16, 2019 7:10 PM
---Advertisement---

पुणे | भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर हा सामना १० जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.

पुण्यात होणारा हा आजपर्यंतचा तिसराच टी२० सामना ठरणार आहे. पुण्यातील याच स्टेडियमवर आजपर्यंत २ कसोटी, ४ वनडे आणि २ टी२० सामने झाले आहेत. या दोन टी२० सामन्यांपैकी एक सामना भारत श्रीलंका संघासोबत पराभूत झाला असून दुसरा इंग्लंड संघासोबत विजयी झाला आहे.

श्रीलंका संघाविरुद्ध पहिला टी२० सामना गुवाहाटी येथे तर दुसरा सामना इंदोर येथे होणार आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या तिसऱ्य़ा सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.

पुण्यात आयोजीत होणारा या स्टेडियमवरील हा ९वा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे.

सामन्याची तिकीट विक्री १७ डिसेंबरपासून-

या सामन्यासाठीची तिकीटविक्री १७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने तिकीटविक्री होणार आहे. त्यात ऑफलाईन पद्धतीने पीवायसी हिंदू जिमखाना डेक्कन आणि गहुंजे येथे तिकीट विक्री होणार आहे. यावेळीही तिकीटांचे दर एमसीएकडून कमी करण्यात आलेले नाही. सोयीसुविधांचा विचार करता हे दर नक्कीच जास्त आहेत. यात ८०० रुपयांपासून ते ३५०० रुपयांपर्यंत तिकीटांचे दर ठरले आहेत.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---