पुणे: पुणेरी पलटण, शिव छत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालवाडीतील त्यांच्या होम-ग्राउंडवर विजेतेपद ‘घेऊन टाकण्यास’ तयार आहे. फ्रॅन्चाइसी तर्फे पुण्यात होणाऱ्या विवो प्रो कब्बडी लीग सीझन ६ मधील होणाऱ्या त्यांच्या स्पर्धांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीस सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर १८ ते २४ दरम्यान होत असलेल्या या स्पर्धांच्या वेळी स्टेडियम गाजवून सोडण्यास पुणेरी पलटण तयार आहे.
बुक माय शो तसेच पुणेरी पलटणच्या अधिकृत साईटवरून ही तिकिटे मिळवता येतील. पुण्याच्या शिव छत्रपती क्रीडा नगरीत म्हाळुंगे-बालेवाडी यथे होणाऱ्या स्पर्धांची ऑफलाईन तिकिटे त्याच ठिकाणी स्पर्धेच्या दोन दिवस आधीपासून मिळतील.
पुणेरी पलटणच्या चाहत्यांची संख्या आणि प्रेक्षकांचा कब्बडीतील वाढता रस पाहता, व्यवस्थापणाला खात्री आहे की पुणेरी पलटणचे पाठीराखे मोठ्या प्रमाणावर स्टेडियम मध्ये गर्दी करून खेळाडूंना प्रोत्साहन देतील.
पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील स्पर्धीतील पहिला सामना गुजरात फॉर्च्युन जायन्ट्स च्या विरोधात ऑक्टोबर १८, २०१८ रोजी होणार आहे.
यावेळी बोलताना, पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कैलाश कांडपाल म्हणाले, “प्रत्येक सिझनला इतक्या मोठ्या प्रमाणावर स्टेडियम मध्ये एकत्र येऊन खेळाडूंचा उसाह वाढवणारा कब्बडी शौकिनांचा आणि पुणेरी पलटणच्या चाहत्यांचा वर्ग आहे, हे आमचे सौभाग्य आहे.
पुणेरी पलटण हा ‘त्यांचा’ संघ आहे आणि आमचे हे कुटुंब दहा लाखांपर्यंत पोहोचले असून चाहत्यांची संख्या वाढतच आहे. गेल्या सीझनमध्ये पुण्यातील प्रत्येक सामना हाऊस-फुल्ल होता. आम्हाला आमच्या चाहत्यांच्या प्रेमाची जाणीव आहे आणि या भक्कम तसेच अतुलनीय आधारासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभार मानतो.
विवो प्रो कब्बडी लीग ही स्पर्धा मोठी होत चालली आहे आणि त्यातील पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील सामने प्रेक्षणीय असतील आणि ते पहायला पुणेकर या वर्षी सुद्धा गर्दी करतील यात शंकाच नाही.”
देशभरात कब्बडी विषयी प्रेम आणि आकर्षण वाढत आहे आणि प्रेक्षक प्रत्येक ३० सेकंदांनंतर एका रोमांचक क्षणाची वाट पाहत असतात. पुणेरी पलटणच्या चाहत्यांसाठी पुण्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धांना हजर राहून त्यांच्या आवडत्या संघाला खेळताना पाहून प्रोत्साहित करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होत आहे.
विवो प्रो कब्बडी लीग मधील पुणेरी पलटण हा एक उत्तम प्रतिस्पर्धी संघ आहे. पुणेरी सिंह त्यांच्या गुहे मध्ये डरकाळी फोडण्यास उत्सुक आहेत. आपल्या असंख्य चात्यांबरोबरच पुणेरी पलटण कब्बडीचा खेळ तळागाळापर्यंत नेण्यास बांधील आहे.