---Advertisement---

पुनित बालन गृप प्रस्तुत ४९वी राज्यस्तरिय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धा नाशिकमध्ये

Judo
---Advertisement---

नाशिक। पुनित बालन गृप पुणे प्रस्तुत आणि महाराष्ट्र ज्यूदो संघटनेद्वारा आयोजित 49वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट खुली स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चांचणी स्पर्धा सोमवार, मंगळवार आणि बुधवारी नाशिक येथे संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेद्वारा आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. जवळपास 130 पुरुष आणि 90 महिला ज्यूदोपटू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत.

नाशिक जिल्हा ज्यूदो संघटनेच्या सहकार्याने हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडीयममध्ये तीन दिवस या स्पर्धा आयोजिल्या आहे. स्पर्धकांचे आगमन 8 ऑगस्ट, सोमवारी होईल. या दिवशी स्पर्धकांची नावनोंदणी, वजने घेणे, स्पर्धेचे लॉट्स टाकणे यासह मॅनेजर्स मिटिंग हे कार्यक्रम होतील.

उद्घाटन मंगळवारी

स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी होईल. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पश्चात स्पर्धांना प्रारंभ होईल. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे असून यावेळी मित्र विहारचे अध्यक्ष विनोद कपूर, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक, उपाध्यक्ष आणि नाशिक ज्यूदो संघटनेचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन, सहसचिव डॉ. गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रवी पाटील, सचिव दत्ता आफळे, डॉ. सतीश पहाडे, सौ अर्चना पहाडे, जयेंद्र साखरे या पदाधिकार्‍यांबरोबरच नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक विजय पाटील आणि स्पर्धा संचालक शैलेश देशपांडे यांची यावेळी उपस्थिती असेल.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

जवळपास 26 जिल्ह्यातील सव्वादोनशे ज्यूदोपटू आपले कौशल्य या दोन दिवसात आजमावणार आहेत. या स्पर्धा राष्ट्रीय निवड चांचणी स्पर्धा असल्याने स्पर्धेतील विजेते लखनौ येथे आयोजित 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे प्रातिनिधीत्व करतील.

स्पर्धेत सहभाग घेणार्‍या राज्यातील या खेळाडुंमध्ये नाशिकचा आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू अजिंक्य वैद्य, औरंगाबादची आशियाई स्पर्धेत कांस्य पदक विजेती श्रद्धा चोपडे, ठाण्याची अपूर्वा पाटील, क्रीडा प्रबोधिनीची समीक्षा शेलार यांच्या बरोबरीने दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त केलेले आदित्य परब आणि गौतमी कंचन, पुणे, केतकी गोरे, नागपूर, शायना देशपांडे, ठाणे, आदित्य धोपावकर, अहमदनगर, प्रदीप गायकवाड, सोलापूर या खेळाडूंची अव्वल कौशल्ये पहाण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. यातील अपूर्वा पाटील, अजिंक्य वैद्य यांनी सलग तीनवेळा राज्य स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला असून पुण्याचा विकास देसाई याने सलग दहा वर्ष प्रथम क्रमांक कायम ठेवला असून अकराव्यांदा आपले स्थान कायम टिकवण्यासाठी तो या स्पर्धेत उतरत आहे.

स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील वीस पंचांची नियुक्ती राज्य तांत्रिक समितीतर्फे करण्यात आलेली असून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे हे स्पर्धा संचालक आहेत. नुकतीच आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्मिता शेट्टी, शिल्पा सेरिगर या मॅट प्रमुख म्हणून काम पाहतील. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाशिकच्या स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैद, माधव भट आदी प्रयत्नशिल आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बुमराह आशिया चषकातून बाहेर, तरीही टीम इंडियाला नाही चिंता! ‘हा’ खेळाडू आहे कारण

प्रदर्शनाचा दराराच म्हणायचा! दीर्घकाळ संघातून बाहेर असूनही ‘या’ भारतीय क्रिकेटरची थेट एशिया कपसाठी निवड

भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---