जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत खेळू शकणार नाहीये. पंतचा मागील वर्षीच्या अखेरीस अपघात झाला होता. त्यानंतर तो मैदानावर परतला नाहीये. तेव्हापासून संघाला त्याची उणीव भासत आहे. सध्या आयपीएल 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतर संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. या सामन्यासाठी भारतीय संघात केएस भरत याला संधी देण्यात आली आहे. मात्र, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने भारतीय संघाच्या एका खेळाडूचे नाव घेतले, जो पंतची जागा घेऊ शकतो.
बदली खेळाडू म्हणून घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्यानंतर भारतीय संघ त्याचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आतापर्यंत संघाला त्याचा चांगला पर्याय मिळाला नाहीये. मात्र, इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने पंजाब किंग्स संघाचा युवा खेळाडू जितेश शर्मा (Jitesh Sharma) याला रिषभ पंत याचा चांगला पर्याय म्हटले आहे. पीटरसननुसार, “जर जितेशला पंतच्या जागी संघात खेळवण्याची संधी मिळाली, तर तो खूप चांगली कामगिरी करू शकतो.”
खरं तर, मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जितेशने 7 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने 25 धावांची शानदार खेळी साकारली होती. यावरूनच पीटरसनने त्याची प्रशंसा केली आहे.
कशी आहे आयपीएल 2023मधील जितेशची कामगिरी?
जितेश शर्मा याने 2022मध्ये पंजाब किंग्स संघाकडून आयपीएल पदार्पण केले होते. पंजाबने मागील वर्षी 20 लाख रुपये खर्च करून जितेशला ताफ्यात सामील केले होते. यावर्षीही पंजाबने त्याला 20 लाख रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्याने आयपीएल 2023च्या हंगामात 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 20च्या सरासरीने 145 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 चौकार आणि 10 षटकारांचाही समावेश आहे. (punjab kings jitesh sharma the best replacement for rishabh pant said this former cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकने धोनीला म्हटले GOAT, तर आयपीएलचा सर्वात दुर्लक्षित खेळाडू म्हणून घेतले ‘या’ धुरंधराचे नाव
धोनीला विरोधी संघाकडूनही मिळतोय तुफान पाठिंबा; राजस्थानचा खेळाडू म्हणाला, ‘आता तो मैदानात असूनही…’