येत्या काही दिवसात भारतात क्रिकेटचा सर्वात मोठा उत्सव सुरू होणार आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून सुरु होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. तसेच येणाऱ्या हंगामाकरिता प्रीती झिंटाच्या मालकीचा संघ, पंजाब किंग्स संघ नवीन स्टाइलमध्ये प्रवेश करणार आहे.
आयपीएल २०२१ साठी झालेल्या लिलावाच्या वेळी किंग्स इलेव्हेन पंजाब संघाने आपल्या संघाच्या नावात बदल केला होता. त्यामुळे आता हा संघ ‘पंजाब किंग्स’ या नावाने ओळखला जाईल. तसेच केएल राहुल, ख्रिस गेलसारख्या दिग्गज खेळाडूंचा हा संघ येत्या १४ व्या हंगामात नवीन जर्सीमध्ये दिसून येणार आहे. नुकतेच पंजाब किंग्स संघाने आपली नवीन जर्सी लाँच केली आहे.
याबाबतची माहिती पंजाब किंग्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. त्यांनी जर्सी लाँच करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून,” प्रतिक्षा संपली, आम्ही सादर करत आहोत आमची नवीन जर्सी,” असे लिहिले आहे.
𝐓𝐡𝐞 𝐰𝐚𝐢𝐭 𝐢𝐬 𝐨𝐯𝐞𝐫! ⌛
Reveal kar rahe hain assi, saddi new jersey 👕😍#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 pic.twitter.com/zLBoD0d5At
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 30, 2021
काय आहे जर्सीमध्ये वेगळेपण
पंजाब संघाने चाहत्यांची प्रतिक्षा न लांबवता अखेर आज (३१ मार्च) त्यांनी आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. या जर्सीचे वेगळेपण म्हणजे ही जर्सी लाल रांगाचीच आहे. परंतु या जर्सीवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे पट्टे देण्यात आले आहे. तसेच त्यांनी आपला लोगो देखील बदलला आहे. तसेच यावर्षी ते सोनेरी रंगाचे हेल्मेट घालून खेळताना दिसणार आहेत.
गतवर्षी पंजाब संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे यंदा जर्सीमध्ये बदल झाला असला आणि संघाचे नाव बदलले गेल्यानंतर तरी त्यांना चांगली कामगिरी करता येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयपीएल २०२१ साठी पंजाब किंग्स संघ
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नीलकांडे, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत बराड़, इशान पोरेल, रिले मेरेडिथ, मोइजेस हेनरीकेज, जोय रिचर्डसन, डेव्हिड मालन, फेबियान, ऐलन, जलज सक्सेना, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग, रवि बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा चेंडू किती महाग असतो माहीत आहे का? घ्या जाणून
सचिन, गांगुली आणि द्रविडने २४ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन
आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज