---Advertisement---

एकदम हटके! पंजाबच्या शाहरुख खानने प्रीती झिंटाबरोबरील फोटोला दिलेल्या ‘त्या’ कॅप्शनची रंगली चर्चा

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा लिलाव यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडला होता. या लिलावावेळी तमिळनाडूच्या एका खेळाडूने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याने केवळ त्याच्या कामगिरीमुळे नाही तर त्याच्या नावामुळेही सर्वांचे लक्ष वेधले होते. तो खेळाडू म्हणजे शाहरुख खान. या २५ वर्षीय शाहरुखने यंदाच्या आयपीएल हंगामातून पंजाब किंग्स संघाकडून आयपीएल कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. दरम्यान, सध्या तो त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

शाहरुख खान हे नाव भारतात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमध्ये ‘किंग खान’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याचे नाव शाहरुख खान आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार शाहरुख आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहसंघमालकही आहे. त्यामुळे तमिळनाडूचा क्रिकेटपटू असलेल्या शाहरुखचे नाव आयपीएल २०२१ दरम्यान चर्चेचा विषय ठरले होते.

नुकतेच या युवा क्रिकेटपटूने पंजाब संघाची सहसंघमालकिन प्रीती झिंटासह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘कल हो ना हो’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत ‘नैना १,२,३ टिंग’, असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.

सांगण्यासारखी गोष्ट अशी की ‘कल हो ना हो’ या चित्रपटात प्रीती झिंटाने नैना या मुलीची भूमीका केली होती. तर तिच्यासह त्या चित्रपटात अभिनेता शाहरुखही होता. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला होता.

https://www.instagram.com/p/COiPh88DhaI/

शाहरुखला लिलावत खरेदी करताच प्रीतीला झाला होता आनंद
आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये पार पडला होता. या लिलावात पंजाब किंग्सने ५ कोटी २५ कोटी रुपयांची बोली लावत शाहरुखला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते.

या लिलावावेळी पंजाब किंग्सच्या टेबलच्या मागे कोलकाता नाईट रायडर्सचा टेबल होता आणि त्या टेबलवर अभिषेक नायर, व्येंकी मैसूरसह बॉलीवूड अभिनेता व केकेआरचा सहसंघमालक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बसला होता. त्यामुळे क्रिकेटपटू शाहरुखला खरेदी करताच प्रीतीने मान वळवत आर्यनला ‘मला शाहरुख मिळाला’, असे म्हटले होते. या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

शाहरुखची आयपीएल २०२१मधील कामगिरी 
शाहरुखने आयपीएलच्या या हंगामातून पदार्पण करत सर्वांनाच प्रभावित केले. खरंतर सध्या हा हंगाम ४ मे रोजी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या हंगामात शाहरुखने ८ सामने खेळले. यात त्याने १०७ धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने ३६ चेंडूत केलेली ४७ धावांची खेळी ही त्याची हंगामातील सर्वोत्तम खेळी ठरली.

शाहरुखची एकूण कारकिर्द 
शाहरुख तामिळनाडू संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्याने ५ प्रथम श्रेणी सामने, २५ अ दर्जाचे सामने व ३९ टी२० क्रिकेट सामने खेळले आहेत. शाहरुखने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३१ धावा, अ दर्जाच्या सामन्यात ४८४ धावा व ३ विकेट आणि टी२० क्रिकेटमध्ये ४०० धावा व २ विकेट घेतल्या आहेत.

सय्यद मुश्ताक अली टी -२० ट्रॉफी २०२१ मधील कामगिरीने वेधले लक्ष
सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या बाद फेरीमध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध १९ चेंडूत आक्रमक ४९ धावांची खेळी करत त्याने तामिळनाडू संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच बडोदा संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ७ चेंडूत ताबडतोड १८ धावांची खेळी करत त्याने तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

बापरे! आयपीएल २०२१ पूर्ण झाले नाही तर ‘एवढ्या’ कोटींचे होणार नुकसान, गांगुलीनेच केला खुलासा

घरात राहा! मुंबई इंडियन्सचा हटके पद्धतीने सॅनिटायझर बॉटलच्या माध्यमातून खास संदेश

संघसहकारी असावा तर असा! केवळ जैयस्वाललाच नाही तर अनुज रावतलाही बटलरकडून मिळाली खास भेट, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---