सोमवारी (२६ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ गडी राखून पंजाब किंग्ज संघावर विजय मिळवला. या सामन्यात पंजाब संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. तसेच या संघात असा एक खेळाडू आहे, ज्याला कोटींची बोली लावत संघात स्थान देण्यात आले होते. तरीदेखील तो संघासाठी निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहे.
कोलकाता संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने अवघ्या १२३ धावा केल्या होत्या. यामध्ये मयंक अगरवालने सर्वाधिक ३१ धावांची तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची खेळी केली होती. तसेच पंजाब किंग्ज संघाने ४.२० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलेला निकोलस पुरन या सामन्यातही पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे.
कोलकाता संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात संघ अडचणीत असताना तो अवघ्या १९ धावा करत माघारी परतला होता. त्याने या हंगामात पंजाब किंग्ज संघासाठी ६ सामने खेळले आहे. यात त्याला ५.६ च्या सरासरीने अवघ्या २८ धावा करण्यात यश आले आहे.
मुख्य बाब म्हणजे तो या हंगामात ३ वेळेस शून्य धावांवर बाद झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अवघे २ चेंडू खेळले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८ चेंडूंवर ९ धावा केल्या होत्या. तर सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो एकही चेंडू न खेळता माघारी परतला होता.
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात निकोलस पुरनला पंजाब किंग्ज संघाने ४.२ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने आयपीएल २०१९ स्पर्धेत ७ सामन्यात १६८ धावा केल्या होत्या. तर २०२० मध्ये युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने ३५३ धावा केल्या होत्या. येणाऱ्या सामन्यात संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे आयपीएल फ्रँचयाझींचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान, प्रिती झिंटाच्या पंजाबला सर्वात मोठा फटका!
मोठी बातमी! टी नटराजनच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती