आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये आज भारतीय संघाच्या भविष्यातील दोन कर्णधारांच्या मध्ये सामना होणार आहे. एका बाजूला शुबमन गिल आणि दुसरीकडे श्रेयस अय्यर असणार आहेत. श्रेयस अय्यरकडे पंजाब किंग्स संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, तसेच गुजरातचे नेतृत्व शुबमन करणार आहे. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला 26.75 करोड रुपयांना खरेदी केले होते. तो मागच्या हंगामापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करत होता. अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये केकेआर संघ आयपीएल चॅम्पियन्स ठरला होता. आता त्याच्यावर पंजाब किंग्स संघाची जबाबदारी आहे. तसेच गुजरातला हरवणे पंजाबसाठी सोपे नसणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयोगी ठरणार आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे आहे, तसेच या मैदानावर जास्त धावसंख्या केली जाऊ शकते, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्याचबरोबर नव्या नियमांमुळे काही बदल दिसून येतील.
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स संघामध्ये आतापर्यंत आयपीएल मधील 5 सामने खेळण्यात आले आहेत. यादरम्यान तीन सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. तसेच 2 वेळा पंजाब किंग्स संघ विजयी झाला आहे. तसेच मागच्या हंगामात पंजाबने अहमदाबाद मध्ये गुजरातला पराभूत केले होते.
तसेच आज दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते. पंजाब मधील खेळाडू जोरदार आहेत, तसेच गुजरातमध्ये काही सामना जिंकवलेले खेळाडू सामील आहेत. खेळपट्टी पाहून म्हणायचे झाल्यास आज धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी होऊ शकतो.






