देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा सोमवारी (16 ऑक्टोबर) सुरू झाली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पंजाब विरुद्ध आंध्र प्रदेश हा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने विक्रमी 275 धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1714178360170217762?t=iJp1EWDehSQ5ufssd_xxUg&s=19
रांची येथे झालेल्या या सामन्यात पंजाब संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. पंजाब संघासाठी अभिषेक शर्मा व प्रभसिमरन यांनी 8.2 षटकात 92 धावांची सलामी दिली. प्रभसिमरन 24 आणि धिर 17 धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेक व अनमोलप्रीत सिंग ही जोडी जमली. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. देशांतर्गत क्रिकेटमधील मोठे नाव असलेल्या अभिषेकने अवघ्या 51 चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने 112 धावांची वादळी खेळी केली. दुसऱ्या बाजूने अनमोलप्रीतने फक्त 26 चेंडूमध्ये 87 धावांचा तडाखा दिला. यामध्ये सहा चौकार व नऊ षटकार होते. इतर फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे पंजाब संघाने 20 षटकात 6 बाद 275 धावा कुटल्या. ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. तसेच भारतात कोणत्याही टी20 सामन्यात झालेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
या धावांचा पाठलाग करताना आंध्र प्रदेशसाठी अनुभवी रिकी भुई व्यतिरिक्त कोणीही संघर्ष करू शकले नाही. त्याने 52 चेंडूमध्ये 104 धावांची खेळी केली. अखेरीस पंजाब संघाने 105 धावांनी विजय साकार केला.
(Punjab Post 275 In Syed Mushtaq Ali Trophy Against Andhra Pradesh Abhishek Sharma Anmolpreet Shines)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?