इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. १९ सप्टेंबर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील दुबई येथे होणाऱ्या हाय वोल्टेज सामन्याने उर्वरित हंगामाचा शुभारंभ होणार आहे. युएई टप्प्यात आयपीएलचे एकूण ३१ सामने होणार असून फलंदाजांपासून ते अगदी यष्टीरक्षकांपर्यंत सर्वांचे लक्ष्य प्रभावी प्रदर्शन करत आपल्या संघाचा जेतेपद मिळवून देण्याकडे असेल.
आतापर्यंत भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ३८० धावा करत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवने ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर सजवली आहे. दूसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल १७ विकेट्ससह पर्पल कॅपचा मानकरी आहे. परंतु उर्वरित हंगामाची सुरुवात झाल्यानंतर या कॅप इतर खेळाडूंच्या डोक्यावरही सजू शकतात. त्यामुळे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचा खरा विजेता हंगामाच्या शेवटीच कळेल.
तत्पूर्वी आम्ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात दर हंगामात सर्वाधिक फलंदाजांना पव्हेलियनला पाठवत पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी येथे तुमच्या माहितीसाठी दिली आहे.
आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासात दरवर्षी पर्पल कॅप जिंकणाऱ्या गोलंदाजांमध्ये ४ भारतीयांचा समावेश आहे. त्यांपैकी भुवनेश्वर कुमार हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याने सलग २ हंगामात पर्पल कॅप जिंकली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करतानाचा त्याने हा कारनामा केला होता. परदेशी खेळाडूंविषयी बोलायचे झाल्यास, चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्रावोने ही किमया साधली आहे. परंतु त्याला सलग २ वर्षे ही कॅप जिंकता आलेली नाही.
२००८ ते २०२० पर्यंतच्या पर्पल कॅप विजेत्यांची यादी
सोहेल तन्वीर, २२ विकेट्स- २००८
आरपी सिंग, २३ विकेट्स- २००९
प्रज्ञान ओझा, २१ विकेट्स- २०१०
लसिथ मलिंगा, २८ विकेट्स- २०११
मॉर्नी मॉर्केल, २५ विकेट्स- २०१२
ड्वेन ब्रावो, ३२ विकेट्स- २०१३
मोहित शर्मा, २३ विकेट्स- २०१४
ड्वेन ब्रावो, २६ विकेट्स- २०१५
भुवनेश्वर कुमार, २३ विकेट्स- २०१६
भुवनेश्वर कुमार, २६ विकेट्स- २०१७
एँड्य्रू टाय, २४ विकेट्स- २०१८
इमरान ताहिर, २६ विकेट्स- २०१९
कागिसो रबाडा, ३० विकेट्स- २०२०
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या उत्तरार्धात लागणार विक्रमांची रास, पाच भारतीयांसह पोलार्ड-मॉरिस ठोकणार ‘अनोखे’ शतक?
‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड