---Advertisement---

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून बाहेर, रचानोक इंतानोनने सेमीफायनलमध्ये केले पराभूत

---Advertisement---

प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या अडचणी काही संपता संपत नाहीये. दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला इंडोनेशिया ओपन १००० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी विश्वविजेत्या रेचानोक इंतानोनने तिला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

पीव्ही सिंधूला सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत होण्यापूर्वी तिला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोनने तिला ५४ मिनिटात १५-२१, २१-९ आणि २१-१४ ने पराभूत केले.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूचा विक्रम रेचानोक इंतानोन विरुद्ध ४-६ असा होता. तिला गेल्या २ सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पीव्ही सिंधूने चांगली सुरुवात करत ८-३ ची आघाडी घेतली होती. त्यानंतर रेचानोक इंतानोनने हे अंतर ९-१० असे कमी केले होते. ब्रेक पर्यंत पीव्ही सिंधूकडे १ गुणाची आघाडी होती. ब्रेक नंतर पीव्ही सिंधूने सलग ३ गुण मिळवले आणि पहिला सेट आपल्या नावावर केला.

त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रेचानोक इंतानोनने ११-७ ची आघाडी घेतली. त्यानंतर १० पैकी ९ गुण मिळवत तिने दुसरा सेट आपल्या नावावर केला. तसेच तिसऱ्या सेटमध्ये पीव्ही सिंधूकडून काही चुका झाल्या होत्या. ज्यामुळे तिसऱ्या सेटमध्ये देखील रेचानोक इंतानोनने बाजी मारली आणि इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आता अश्विनची नजर दोन भारतीय दिग्गजांच्या विक्रमावर, ‘हा’ कारनामा करण्यापासून २ पावले दूर

न्यूझीलंडचा घाम काढणाऱ्या अक्षर पटेलने ‘लिमिटेड ओव्हर क्रिकेटर’ म्हणणाऱ्यांना दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…

फक्त खेळाडूच नाही, तर निवडकर्ता ते प्रशिक्षक, सर्व भूमिका चोख बजावणाऱ्या अमरनाथांच्या ५ रोमांचक गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---