पुणे| आयकॉन ग्रुप, पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए 1, लॉ कॉलेज लायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या गटात श्रवण हार्डीकर, अमित नाटेकर, योगेश पंतसचिव, मिहीर दिवेकर, सारंग देवी, अमित लाटे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी डायमंड्स संघाने टेनिस हॉक्सचा 18-03 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. अन्य लढतीत एमडब्लूटीए 1 संघाने टीएफएलचा 16-12 असा तर, लॉ कॉलेज लायन्स संघाने सोलारिस गो गेटर्सचा 16-10 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
पीएमडीटीएचे अध्यक्ष व टेनिसप्रेमी अरुण साने यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येत असून या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत सध्याचा खेळाडू, माजी खेळाडू अथवा मार्कर्स यांचा सहभाग नसून हौशी स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांनी सांगितले.
स्पर्धेत एकुण 40 हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघामध्ये होणाऱ्या लढतीत एकुण 3सामन्यांचा समावेश असून यात 2 सामने खुल्या दुहेरी गटात, तर उर्वरित एक सामना 80वर्षावरील(दोन्ही खेळाडूंचे मिळून वय 80वर्षवरील) गटात होणार आहे. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून हि स्पर्धा घेण्यात आल्याचे क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले.
स्पर्धेमध्ये पीवायसी डायमंड्स, एमडब्लूटीए 1, टेनिसनट्स, पीसीएलटीए, एफसी 2, डेक्कन 2, पीवायसी रुबी, पीवायसी पर्ल्स, डेक्कन 3, एफसी 1, डेक्कन 1, लॉ चार्जर्स, हॉक्स, टीएफएल, मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन, द ईगल्स, लॉ कॉलेज लायन्स, एमडब्लूटीए 2, महाराष्ट्र मंडळ, एस डायमंड्स, पीवायसी सॅफायर, एसेस युनायटेड, एमडब्लूटीए 3, टी-20 महाराष्ट्र मंडळ, एफसी 3, सोलारिस गो गेटर्स, गोल्डन बॉईज, एमडब्लूटीए 4 हे 28 संघ झुंजणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, महाराष्ट्रचे(आयजीआर) श्रावण हार्डीकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, आशा साने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नमिता टेपण, नंदू रोकडे, अभिषेक ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट 1: पीवायसी डायमंड्स वि.वि.टेनिस हॉक्स 18-03(80अधिक गट: श्रवण हार्डीकर/अमित नाटेकर वि.वि.मंदार कापशीकर/निलेश नाफडे 6-1; खुला गट: योगेश पंतसचिव/मिहीर दिवेकर वि.वि.सचिन कुलकर्णी/सुनील आहिरे 6-0; खुला गट: सारंग देवी/अमित लाटे वि.वि.अविनाश पवार/अनिरुद्ध जाधव 6-2);
गट 2: एमडब्लूटीए 1 वि.वि.टीएफएल 16-12(80अधिक गट: जयदीप वाकणकर/संजय आशेर वि.वि.केदार राजपाठक/दिपक होनकर 6-2; खुला गट: भूषण जोशी/प्रणिल बाडकर वि.वि.अजय भांजे/विक्रांत गुणे 6-4; खुला गट: संतोष शहा/आदित्य जोशी पराभूत वि.अजिंक्य पाटणकर/कौस्तुभ देशमुख 4-6);
गट 5: लॉ कॉलेज लायन्स वि.वि.सोलारिस गो गेटर्स 16-10(80अधिक गट: अभिजीत मराठे/शिवाजी यादव वि.वि.अमोल गायकवाड/आशिष कुबेर 6-3; खुला गट: तारक पारेख/केतन जाठर पराभूत वि.सचिन खिलारे/सुबोध पेठे 4-6; खुला गट:संतोष जयभाई/राहुल पंढरपुरे वि.वि.आश्विन हळदणकर/महेंद्र गोडबोले 6-1).
महत्त्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफीतही ऋतु’राज’! पाचव्या सामन्यात झळकवले चौथे शतक; महाराष्ट्राचा विजयरथ सुसाट
राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा: बॉईज स्पोर्टसने राखले वर्चस्व; महिला गटात केरळ संघ प्रथम