पुणे, दि. 12 सप्टेंबर 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत यश बोरामणी(66धावा), सूरज शिंदे (59धावा), आशय पालकर(58धावा) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पीबीकेजेसीए संघासमोर 277धावांचे आव्हान उभे केले.
पीवायसी हिंदू जिमखाना, डिझायर स्पोर्टस क्लब मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने 40 षटकांत 7बाद312 धावा केल्या. पण त्यांचे पाच गडी बाद झाल्याने संघांची अंतिम धावसंख्या 277झाली. यात यश बोरामणीने 68चेंडूत 8चौकार व 2षटकारासह 66धावा केल्या.त्याला हर्ष संघवी(23धावा) काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने 58चेंडूत 66धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूरज शिंदेने 71चेंडूत 3चौकार व 3 षटकारासह 59धावा, आशय पालकरने 53चेंडूत 6चौकार व 1षटकारासह 58 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. पीबीकेजेसीएकडून यश खळदकर(3-54), अक्षय दरेकर( 1-43), अथर्व शिंदे(1-45) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पीबीकेजेसीए संघाने आज दिवस अखेर 22 षटकात 3 गडी बाद 160 धावा केल्या. यात निकुंज विठलानीने 81चेंडूत 10चौकराच्या मदतीने नाबाद 72धावा, तर अभिषेक पवारने 53चेंडूत 6चौकार व 2षटकाराच्या मदतीने नाबाद 61धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 108चेंडूत 120धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
डिझायर स्पोर्टस क्लब मैदानावरील लढतीत पूना क्लबच्या शुभम कोठारी 7-30, ओमकार आखाडे 2-34) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्टस क्लबचा पहिला डाव 23.7षटकात सर्वबाद 108धावांवर संपुष्टात आला. त्यांचे 10गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 58धावा झाली. यात अमेय सोमण 29, ऋतुराज धुळगुडे 22 यानी थोडासा प्रतिकार केला. याच्या उत्तरात डावखुरा फिरकीपटू निमिर जोशी(5-22)ने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्लब संघ 28.3षटकात सर्वबाद 109धावांवर कोसळलं 10गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 59धावा झाली. यामध्ये ओमकार आखाडे 23, धनराज परदेशी 15 यांनी धावा केल्या. युनायटेड स्पोर्टस क्लब संघाने पहिल्या डावात 9 धावांची आघाडी घेतली.
युनायटेड स्पोर्टस कलबसंघाने आज दिवस अखेर 4षटकात बिनबाद 18धावा केल्या. यात अद्वैय सिधये नाबाद 10, रोहीत कारंजकर नाबाद 8धावावर खेळत आहे. दोन्ही संघा तील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव : डेक्कन जिमखाना: 40 षटकांत 7बाद 277 (312-35धावा)(यश बोरामणी 66(68, 8×4,2×6), सूरज शिंदे 59(71,3×4,3×6), आशय पालकर 58(53,6×4) 4,1×6), तुषार श्रीवास्तव 32, हर्ष संघवी 23, यश खळदकर 3-54, अक्षय दरेकर 1-43, अथर्व शिंदे 1-45) वि पीबीकेजेसीए: 22 षटकात 3 गडी बाद 160 धावा (निकुंज विठलानी नाबाद 72(81,10×4), अभिषेक पवार नाबाद 61(53, 6×4,2×6), धीरज फटांगरे 1-9, आशय पालकर 1-25);
डिझायर स्पोर्टस क्लब मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्टस क्लब: 23.7षटकात सर्वबाद 58धावा (118-5 0धावा)(अमेय सोमण 29, ऋतुराज धुळगुडे 22, शुभम कोठारी 7-30, ओमकार आखाडे 2-34) वि.पूना क्लब: 28.3षटकात सर्वबाद 59धावा(109-50धावा)(ओमकार आखाडे 23, धनराज परदेशी 15, निमिर जोशी5-22, रामकृष्ण घोष 1-27); युनायटेड स्पोर्टस क्लब संघाकडे पहिल्या डावात 9 धावांची आघाडी;
दुसरा डाव: युनायटेड स्पोर्टस क्लब: 4षटकात बिनबाद 18धावा (अद्वैय सिधये नाबाद 10, रोहीत कारंजकर नाबाद 8धावा) वि. पूना क्लब.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: कसाय फिटनेस? सूर मारतच कॅप्टन रोहितने टिपला झेल, विराटने मारली जादूची झप्पी
ग्रेटेस्ट एव्हर! ऍबॉटने पकडला क्रिकेट इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक झेल, नक्की पाहाच