पुणे, दि. 29 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात रौनक दुबे 51, धनंजय पावडे 39, तुषार राठोड नाबाद 39, विराज आवळेकर 37 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर विलास क्रिकेट क्लब संघाने एमसीए अ संघापुढे 222धावाचे आव्हान उभे केले.
पीवायसी हिंदु जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी विलास क्रिकेट क्लब संघाने 62.5 षटकात सर्वबाद 222धावा केल्या. यात धनंजय पावडेने 56चेंडूत 4चौकार व 2षटकारासह 39धावा, विराज आवळेकरने 59चेंडूत 6चौकरासह 37 धावा केल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 100चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रौनक दुबेने 70चेंडूत 9चौकार व 1षटकारासह 51धावा, तर तुषार राठोड नाबाद 39 धावा काढून संघाला 222 धावांचा टप्पा गाठून दिला. एमसीए अ संघाकडून समेक जगताप(3-50), कपिल पवार(2-16), आदिनाथ परभळकर(2-31), हुजैफ शेख(2-38) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
याच्या उत्तरात एमसीए अ संघाने आज दिवस अखेर 27 षटकात 4बाद 178धावा केल्या. यात आयुष रक्ताडे 42चेंडूत 9चौकार व 4षटकारासह नाबाद 73धावा, तर अभिनंदन गायकवाड 42चेंडूत 6चौकारासह नाबाद 46(42,6×4) धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. (PYC Goldfield Raju Bhalekar Memorial Trophy. Vilas Cricket Club’s challenge of 222 runs against MCA A team in the first innings)
निकाल:
पहिला डाव: विलास क्रिकेट क्लब:62.5 षटकात सर्वबाद 222धावा(रौनक दुबे 51(70,9×4,1×6), धनंजय पावडे 39(56,4×4,2×6), तुषार राठोड नाबाद 39(77,5×4,1×6), विराज आवळेकर 37(59,6×4), अनुराग शेळके 18, समेक जगताप 3-50, कपिल पवार 2-16, आदिनाथ परभळकर 2-31, हुजैफ शेख 2-38) वि एमसीए अ: 27 षटकात 4बाद 178धावा(आयुष रक्ताडे नाबाद 73(42,9×4,4×6), अभिनंदन गायकवाड नाबाद 46(42,6×4), पुष्कर अहिरराव 35(23,7×4) ), राहुल वाजंत्री 3-63, अनुराग शेळके 1-21);
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया