पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अब्दुस अस्लम (4-14)च्या गोलंदाजीसह श्रेयश वाळेकर(65 धावा)च्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पहिल्या डावात आघाडी घेत वर्चस्व राखले. तर, अन्य लढतीत मनोज यादव (4-60) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर डीव्हीसीए संघाने पुना क्लबविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेत वर्चस्व गाजवले.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी पीवायसीच्या अब्दुस अस्लम(4-14), स्वराज चव्हाण(3-16), साहिल चुरी(2-22), आदित्य डावरे(1-30) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजी पुढे युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा पहिला डाव 38.2 षटकात सर्वबाद 100 धावावर कोसळला. यात हर्षवर्धन टिंगरे 23, अद्वैय शिधये 15, निमीर जोशी 13 यांनी थोडासा प्रतिकार केला. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आज दिवस अखेर 38.2 षटकात 4 बाद 119धावा केल्या. यात श्रेयश वाळेकरने 97चेंडूत 6चौकार व 1षटकारासह 65 धावांची संयमी खेळी केली. त्याला अमेय भावेने 37 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने 144 चेंडूत 79 धावांची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा शिल्लक आहे.
वीरांगना मैदानावरील लढतीत डीव्हीसीएच्या मनोज यादव(4-60), ओंकार राजपूत(3-28)यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे पुना क्लबचा पहिला डाव 41 षटकात सर्वबाद 187 धावावर संपुष्टात आला. यात शंतनु ढगेने सर्वाधिक 82धावा केल्या. याच्या उत्तरात डीव्हीसीए संघाने 45 षटकात 3बाद 245धावा करून आघाडी घेतली. यात किरण मोरेने 88चेंडूत 10चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 92 धावा, तर यश 66चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. सलामीच्या या जोडीने 114 चेंडूत 116 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी सुरुवात करून दिली. त्यानंतर ओम भोसले नाबाद 52धावा, अंश धूत नाबाद 33 धावांवर खेळत असून दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
बारणे क्रिकेट अकादमी मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाचा पहिला डाव 46.2 षटकात सर्वबाद 258धावावर आटोपला. यात अतुल विटकर 79, वैभव विभूते 60, नकुल काळे 24, ऋषिकेश बारणे 24 यांनी धावा केल्या. केडन्सकडून सिद्धेश वरघंटे(3-26), निलय शिंगवी(2-21), रझिक फल्लाह(2-23), शुभम खरात(2-55) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. याच्या उत्तरात केडन्स संघाने आज दिवस अखेर 30 षटकात बिनबाद 192धावा केल्या. यात अर्शिन कुलकर्णीने 111 चेंडूत 21चौकारव 2षटकाराच्या मदतीने नाबाद 130 धावांची शतकी खेळी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. अर्शिनला अजिंक्य गायकवाडने नाबाद 56 धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांनी 180 चेंडूत 192 धावांची भागीदारी केली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 38.2 षटकात सर्वबाद 100 धावा(हर्षवर्धन टिंगरे 23(49,3×4,1×6), अद्वैय शिधये 15, निमीर जोशी 13, अब्दुस अस्लम 4-14, स्वराज चव्हाण 3-16, साहिल चुरी 2-22, आदित्य डावरे 1-30) वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 38.2 षटकात 4 बाद 119धावा(श्रेयश वाळेकर 65(97,6×4,1×6), अमेय भावे 37(87,7×4), गुरवीर सिंग सैनी नाबाद 0, अद्वय शिधये ३-३२, आदित्य राजहंस १-४०)
वीरांगना मैदानः पुना क्लबः 41 षटकात सर्वबाद 187 धावा(शंतनु ढगे 82(98,13×4,2×6), सौरभ दोडके 24, ओम पवार नाबाद 20, मनोज यादव 4-60, ओंकार राजपूत 3-28, अॅलन रॉड्रिग्स 2-28 49) वि डीव्हीसीए: 45 षटकात 3बाद 245धावा(किरण मोरे 92(88,10×4,5×6), यश 56(66,10×4), ओम भोसले नाबाद 52(76,4×4), अंश धूत नाबाद 33(41,3×4) 1×6), शंतनू ढगे 1-29, यशवंत काळे 1-44);
बारणे क्रिकेट अकादमी मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 46.2 षटकात सर्वबाद 258धावा(अतुल विटकर 79(77,14×4), वैभव विभूते 60(60,12×4), नकुल काळे 24, ऋषिकेश बारणे 24, सिद्धेश वरघंटे 3-26, निलय शिंगवी 2-21, रझिक फल्लाह 2-23, शुभम खरात 2-55) वि.केडन्स: 30 षटकात बिनबाद 192धावा(अर्शिन कुलकर्णी नाबाद 130(111,21×4,2×6), अजिंक्य गायकवाड नाबाद 56(69,9×4).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी 15 वर्षीय मुंबईकराने घातलेला धावांचा रतीब, एकाच डावा चोपलेल्या नाबाद 1009 धावा
जय शाहांची मोठी माहिती! आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान…