पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत डॉल्फिन्स, पँथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आश्विन शहा याच्या उपयुक्त 39 धावांच्या खेळीच्या जोरावर डॉल्फिन्स 5गडी राखून विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना रायनोज संघाने 6षटकात 3बाद 66धावा केल्या. यात रोहित बर्वे नाबाद 29, अमित परांजपे 12 यांनी धावा केल्या.
याच्या उत्तरात डॉल्फिन्स संघाने 5.3षटकात 3बाद 67धावा करून पूर्ण केले. यात आश्विन शहाने 15 चेंडूत 1चौकार व 4षटकारांच्या मदतीने 39 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आश्विनला रोहन छाजेडने 12 धावा करून सुरेख साथ दिली. सामनावीर आश्विन शहा ठरला.
दुसऱ्या सामन्यात प्रेरित गोयल(2-7 व नाबाद 22धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पँथर्स संघाने स्कायलार्कस संघाचा 7 गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली.प्रथम फलंदाजी करताना प्रशांत सुतार 23(18), अंकुश जाधव 15 यांनी धावांच्या जोरावर स्कायलार्कस संघाने 6षटकात 4बाद 57धावा केल्या. पँथर्सकडून प्रेरित गोयल 2-7, आर्यन देसाई 1-14, आशिष देसाई 1-7)यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान पँथर्स संघाने 5.1षटकात 1बाद 60धावा करून पूर्ण केले. यात कर्णा मेहता नाबाद 31(14), प्रेरित गोयल नाबाद 22 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी प्रेरित गोयल ठरला.
स्पर्धेचे उदघाटन पुसाळकर सु-रक-क्षाचे रोहन आणि विजय पुसाळकर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, बृहन्स ग्रीन लिफचे आशुतोष आगाशे, वूमेन्स क्रिक झोनचे अभिजित खानविलकर, कूपर कॉर्पचे विक्रम ओगळे, अनिल जलिहाल, सारंग लागू आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. कारा इंटलेक्टचे रणजित पांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
रायनोज: 6षटकात 3बाद 66धावा(रोहित बर्वे नाबाद 29(13),3×4,2×6), अमित परांजपे 12, आशय कश्यप 1-4, विश्वेश कुंभोजकर 1-8)पराभूत वि.डॉल्फिन्स: 5.3षटकात 3बाद 67धावा(आश्विन शहा 39(15,1×4,4×6), रोहन छाजेड 12, सिद्धार्थ किर्लोस्कर 1-6, नकुल बेलवलकर 1-15);सामनावीर-आश्विन शहा.;
स्कायलार्कस: 6षटकात 4बाद57धावा(प्रशांत सुतार 23(18), अंकुश जाधव 15(9), प्रेरित गोयल 2-7, आर्यन देसाई 1-14, आशिष देसाई 39(15,1×4,4×6), 1-7)पराभूत वि.पँथर्स: 5.1षटकात 1बाद 60धावा(कर्णा मेहता नाबाद 31(14,1चौकार, 3षटकार), प्रेरित गोयल नाबाद 22(11), आशिष देसाई 5);सामनावीर-प्रेरित गोयल.