पुणे, 13 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत बेलवलकर बॉबकॅट्स, लायन्स या संघांनी तिसरा विजय मिळवला.
पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अभिजीत गानू(1-6 व 45धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर बेलवलकर बॉबकॅट्स संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्स संघावर 23 धावांनी विजय मिळवला.
अन्य लढतीत प्रसाद जाधव 40 धावांच्या खेळीच्या जोरावर ए अँड ए शार्क्स संघाने साठे-बोथरा जॅगवॉर्सचा पहिला विजय नोंदवला. इशांत रेगे नाबाद 39 धावांच्या जोरावर लायन्स संघाने ट्रुस्पेस नाइट्सचा 7 गडी राखून पराभव करत तिसरा विजय नोंदवला. पारितोश शेट्टी(नाबाद 26 व 1-4)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोतवाल युनिकॉर्नस संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्सवर 5 गडी राखून पहिला विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
बेलवलकर बॉबकॅट्स: 6 षटकात 1बाद 104धावा(अभिजीत गानू 45(15,7×4,2×6), अनुज साबडे नाबाद 35(11,1×4,5×6), नील बेलवलकर नाबाद 22(10,2×4,1×6), श्रीनिवास चाफळकर 1-16) वि.वि. ओव्हनफ्रेश टस्कर्स: 6 षटकात 5बाद 81धावा (गौरव सावगावकर 26(9,1×4,3×6), श्रीनिवास चाफळकर 20, मल्हार शिंदे 17, अभिजीत गानू 1-6, नील बेलवलकर 1-12, नकुल बेलवलकर 1-14); सामनावीर – अभिजीत गानू; बेलवलकर बॉबकॅट्स संघ 23 धावांनी विजयी;
ए अँड ए शार्क्स: 6 षटकात 4बाद 100धावा(प्रसाद जाधव 40(13,3×4,4×6), आत्मन बागमार 25(7,4×6), अंकुश जाधव 24(13,1×4,2×6), निखिल डोंगरे 2-12, शैलेश बोथरा 1-10)वि.वि.साठे-बोथरा जॅगवॉर्स: 6 षटकात 2बाद 52धावा(अंजनेय साठे नाबाद 20, सत्यजीत राक्षे 16, हर्षल गंद्रे 10, मेहुल जैन 1-6, अंकुश जाधव 1-13); सामनावीर-प्रसाद जाधव; ए अँड ए शार्क्स संघ 48 धावांनी विजयी;
ट्रुस्पेस नाइट्स: 6 षटकात 2बाद 52धावा(रोहित अगरवाल नाबाद 27(15,1×4,2×6), कल्पक पत्की नाबाद 13, मोनीश गोखले 2-4)पराभुत वि.लायन्स: 3.3 षटकात 1बाद 54धावा(इशांत रेगे नाबाद 39(13,1×4,5×6), नील हळबे 1-15); सामनावीर-इशांत रेगे; लायन्स संघ 7 गडी राखून विजयी;
ओव्हनफ्रेश टस्कर्स: 6 षटकात 2बाद 71धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 50 (19,5×4,4×6), गौरव सावगावकर नाबाद 10, पारितोश शेट्टी 1-4) पराभुत वि.कोतवाल युनिकॉर्नस: 6 षटकात 3बाद 72धावा(पारितोश शेट्टी नाबाद 26(10,3×6), देव शेवाळे 25(9,4×6), रोहित बर्वे 13, आयुष जगताप 1-8);सामनावीर – पारितोश शेट्टी; कोतवाल युनिकॉर्नस संघ 5 गडी राखून विजयी;
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानचा घाम काढणार वॉर्नर, कारकिर्दीतील शेवटची मालिका राहणार लक्षात; आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल अंदाज
वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!