भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील 4 सामन्यांच्या मालिकेतील ब्रिस्बेन येथे होणारा चौथा कसोटी सामना धोक्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, क्विन्सलँडमध्ये कोरोना नियम अधिक कडक केलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ ब्रिस्बेनला जाऊ इच्छित नाही व सिडनी येथेच सलग दोन सामने खेळण्यास तयार आहे.
ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. असे असतानाच भारतीय संघाच्या ब्रिस्बेनला न जाण्याच्या भूमिकेवर क्विन्सलँड शॅडो सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शॅडो हेल्थ मिनिस्टर रोस बेट्सयांनी स्पष्ट केले आहे की ‘जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी इकडे न आलेले बरे राहील.’ तसेच शॅडो सरकारमधील मंत्री टिम मंडेर यांनी देखील स्पष्ट केले की भारतीय संघाला नियमांचे पालन करणे गरजेचे असेल.
दरम्यान हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ऑस्ट्रेलियामध्ये वर्तमान सरकार मागे विरोधी पक्षाचे शॅडो सरकार असते. शॅडो सरकारमधील व्यक्तींना व मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसतात, पण त्यांच्या मताला महत्त्व असते.
Today I was asked about reports the Indian Cricket Team wants quarantine restrictions eased just for them, ahead of the upcoming Gabba Test. My response 👇 #Cricket #IndiavsAustralia @ICC @CricketAus pic.twitter.com/MV7W0rIntM
— Ros Bates MP RN (@Ros_Bates_MP) January 3, 2021
भारतीय संघाच्या एका सूत्राने माहिती दिली होती की, भारतीय संघातील खेळाडू बराच वेळ क्वारंटाईनमध्ये राहिलेले आहे. सुरुवातीच्या काळात यूएईमध्ये तसेच त्यानंतरच्या काळात ऑस्ट्रेलियामध्ये देखील ते क्वारंटाईन राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा त्यांना ब्रिस्बेन मध्ये क्वारंटाईन राहण्याची इच्छा नाही. त्यामुळे हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की चौथ्या कसोटी सामन्या संदर्भात कुठला निर्णय घेतला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅथ्यू वेडने घेतली ‘या’ दोन भारतीय गोलंदाजांची धास्ती, म्हणाला…
…तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा बनू शकतो पहिलाच क्रिकेटर
रोहित शर्मावर होतायत ‘बीफ’ खाल्याचे आरोप, सोशल मीडियावर कथित बील व्हायरल