दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध टी20 आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या भारत दौऱ्यात 15 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान 3 टी20 आणि 3 कसोटी सामने होणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ट्विट केले आहे की ‘भारतात येऊन उत्साहित वाटत आहे. इथे पुन्हा क्रिकेट खेळण्याची वाट पाहत आहे.’
Excited to be back in India and looking forward to playing cricket again 🇿🇦🇮🇳
— Kagiso Rabada (@KagisoRabada25) September 7, 2019
दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी दिल्लीतील दक्षिण आफ्रिकेच्या उच्च आयुक्तालयाला भेट देणार आहे. तसेच त्याच दिवशी धरमशाला येथे दाखल होणार आहे. 15 सप्टेंबरला धरमशाला येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पहिला टी20 सामना होणार आहे.
या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका संघ प्रभारी संघ संचालक एनोच क्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. दक्षिण आफ्रिकेने त्यांचे माजी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षकाची नेमनुक अजून झालेली नाही.
दक्षिण आफ्रिका संघ या भारत दौऱ्यात 15, 18 आणि 22 सप्टेंबरला तीन टी20 सामने खेळणार आहे. हे टी20 सामने अनुक्रमे धरमशाला, मोहाली आणि बंगळूरु येथे होतील.
त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रांचीत होणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक – [फ्रिडम ट्रॉफी – 2019(भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका)] –
टी20 मालिका–
15 सप्टेंबर – पहिला टी20 सामना – धरमशाला (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
18 सप्टेंबर – दुसरा टी20 सामना – मोहाली (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
22 सप्टेंबर – तिसरा टी20 सामना – बंगळूरु (वेळ – संध्याकाळी 7 वाजता)
कसोटी मालिका-
2-6 ऑक्टोबर – पहिली कसोटी – विशाखापट्टणम (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
10-14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी – पुणे (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
19-23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी –रांची (वेळ – सकाळी 9.30 वाजता)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून संजू सॅमसनने मॅच फिचे दीडलाख रुपये दिले ग्राउंडस्टाफला
–यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद
–असा होणार आहे पुढीलवर्षी महिला टी२० विश्वचषक, जाणून घ्या सर्वकाही…