दक्षिण अफ्रिका क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहे. मागील दोन वर्षात आफ्रिका संघाची कामगिरी तितकीशी समाधानकारक झाली नाही. त्याचाच परिणाम म्हणून वनडे व टी२० क्रिकेटमध्ये क्विंटन डी कॉककडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यावेळी चर्चा रंगली होती की, कसोटी कर्णधार पदासाठी इतर खेळाडूची निवड केली जाऊ शकते. मात्र, श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी डी कॉककडेच कसोटी कर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र, पत्रकारांशी बोलताना डी कॉकने स्पष्ट केले आहे की, तो पूर्णवेळ कसोटी कर्णधार राहणार नाही.
योग्य कर्णधार मिळे पर्यंतच भूषवणार कसोटी कर्णधारपद
पत्रकारांशी बोलताना डी कॉक म्हणाला, “कसोटी कर्णधारपद हे केवळ थोड्या कालावधीसाठीच आहे. जोपर्यंत निवड समिती समोर योग्य पर्याय उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंतच मी कर्णधारपद भूषवणार आहे. कदाचित आगामी क्रिकेट हंगामापर्यंत मी कर्णधार असू शकतो. मात्र, भविष्यात मी कसोटी कर्णधार नसणार हे निश्चित आहे.”
वनडे क्रिकेटमध्ये काही काळ नाही करणार यष्टीरक्षण
डी कॉकने स्पष्ट केले की, इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका मालिका झाली असती, तर त्याने त्यात यष्टीरक्षण केले नसते. डी कॉकच्या मते सध्या युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे. मात्र, तो भविष्यातही कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करणार हे निश्चित आहे.
डी कॉकने ८ वनडे आणि ११ टी२० सामन्यांमध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्त्व केले आहे. याव्यतिरिक्त त्याने संघाकडून आतापर्यंत ४७ कसोटी सामने, १२१ वनडे सामने आणि ४७ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ३९.१२ च्या सरासरीने २९३४ धावा केल्या आहेत. सोबतच वनडेत त्याने ४४.६५ च्या सरासरीने ५१३५ धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने ३१.०२ च्या सरासरीने १३०३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
मोठी बातमी! भारताला जोरदार धक्का, रवींद्र जडेजा झाला दुखापतग्रस्त
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’