दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23 व्या सामन्यासाठी आमने-सामने आले आहेत. मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे हा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ऐडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक याने आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्याने या फॉर्मचा फायदा उठवत स्पर्धेतील आपले तिसरे शतक पूर्ण केले.
Unstoppable Quinton de Kock hits his third #CWC23 ton to power South Africa in Mumbai 👊@mastercardindia Milestones 🏏#SAvBAN pic.twitter.com/i8yoBCNslR
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 24, 2023
आपला अखेरचा विश्वचषक खेळत असलेल्या डी कॉकने या स्पर्धेतील आपला शानदार फॉर्म कायम राखला. पहिल्या दोन सामन्यात शतके झळकावल्यानंतर पुढील दोन सामन्यात तो काहीसा अपयशी ठरला होता. मात्र, या सामन्यात त्याने या अपयशाची भरपाई केली. रिझा व डसेन लवकर बाद झाल्यानंतरही त्याने कर्णधार एडन मार्करम याच्यासोबत शतकी भागीदारी केली.
त्याने याही पुढे जात केवळ 101 चेंडूंमध्ये विश्वचषकातील आपले तिसरे शतक पूर्ण केले. यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता. त्याने या स्पर्धेत चांगली सुरुवात करताना पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध व दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलेले. यापूर्वीच त्याने जाहीर केले आहे की, या विश्वचषकानंतर तो वनडे क्रिकेटमधून निवृत्त होईल.
(Quinton de Kock Hits 3rd Century In ODI World Cup 2023)