शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३२व्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले. मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ४४ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा नायक ठरला. मात्र त्याने सामन्यादरम्यान खूप हास्यास्पद गोष्ट केली.
झाले असे की, मुंबईचा सलामीवीर फलंदाज डी कॉक चक्क ट्रेनिंग ट्राउझर घालून पूर्ण सामन्यात फलंदाजी करताना दिसला. पण यामुळे मार्केटिंग टीमला वाईट वाटू शकते. तसेच चाहतेही या गोष्टीमुळे त्याच्यावर निशाणा साधू शकतात. म्हणून संघाचा प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने डी कॉकला पुन्हा कोणत्याही सामन्यात ट्रेनिंग ट्राउझर घालू नये, असा सल्ला दिला.
🚨 Milestone alert 😋
Last night, Quinton de Kock became the first #MI player to play an @IPL match in his 𝕥𝕣𝕒𝕚𝕟𝕚𝕟𝕘 𝕥𝕣𝕠𝕦𝕤𝕖𝕣 👖😂#OneFamily #MumbaiIndians #Dream11IPL @MahelaJay pic.twitter.com/TYjJfv6K2j
— Mumbai Indians (@mipaltan) October 17, 2020
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जयवर्धनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी अतिशय मजेशीर कॅप्शन देत लिहिले आहे की, “क्विंटन डी कॉक हा मुंबई संघाचा पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्याने ट्रेनिंग ट्राउझर घालून आयपीएल सामना खेळला आहे.” सोबतच त्याने पँट आणि हसतानाचा इमोजीही टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
२६व्या वर्षीच मारली सुटा बुटातील नोकरीला लाथ, आता गाजवतोय आयपीएल
‘विराटचं अकाउंट हॅक?’ कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
“तो एक दिग्गज खेळाडू, माझ्या मोठ्या भावासारखाच”, ब्रावोवर हसल्याबद्दल गोलंदाजाची सारवासारव
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष