---Advertisement---

“कोणीतरी येणार येणार गं!” क्विंटन डी कॉक कुटुंबात होणार नवीन सदस्याचे आगमन, ‘अशी’ पोस्ट करत दिली माहिती

On: सोमवार, जुलै 12, 2021 2:55 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकन संघाचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. ही गोड बातमी डी कॉकने आणि त्याची पत्नी साशा डी कॉकने शेअर केली आहे.

क्विंटन डी कॉक आणि त्याची पत्नी साशा डी कॉक हे दोघेही २०१६ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डी कॉकची पत्नी साशा डी कॉक ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.

क्विंटन डी कॉक आणि ती एका बोटमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तिच्या हातात छोट्या बाळाचे कपडे आहेत. तिने या फोटोवर कॅप्शन देत “बेबी डी कॉक जानेवारी २०२२ मध्ये येणार आहे.” असे लिहिले आहे. अशीच पोस्ट क्विंटन डी कॉकनेही शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CRLeBNdMQrR/

ही गोड बातमी मिळताच संघ सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मुंबई इंडियन्स संघातील संघ सहकारी सूर्यकुमार यादव आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा क्रिकेटपटू वेन पार्नेलने सह आणखी काही क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

डी कॉक, आयर्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत खेळताना दिसून येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ११ जुलै रोजी खेळला गेला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

क्विंटन डी कॉकची कारकीर्द

क्विंटन डी कॉकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ५३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३९.१ च्या सरासरीने ३२४५ धावा केल्या आहेत. यात त्याने ६ शतक आणि २२ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच १२३ वनडे सामन्यात त्याने ४४.७ च्या सरासरीने ५२३५ धावा केल्या आहेत. यामध्ये १५ शतक आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ५२ टी -२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३३.१ च्या सरासरीने १५५८ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी 

दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का देत मालिकेत केली बरोबरी

विम्बल्डनचा अंतिम सामना पाहाण्यासाठी ‘देसी गर्ल’ची उपस्थिती, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---