भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडू सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान त्याने काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आर अश्विन काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या सामन्यात त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना अडकवून ठेवले होते. त्याने सामन्यातील पहिल्या दोन सत्रात एकूण २४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ५८ धावा देत १ गडी बाद केला होता.
सर्रे संघाचा कर्णधार आणि इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याने पहिल्याच षटकात अश्विनला गोलंदाजी सोपवली होती. यासह अश्विन काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर डावाची सुरुवात करणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. यापुर्वी २०१० मध्ये हा कारनामा जितन पटेलने केला होता. (R Ashwin achieves milestone in first match for surrey)
जास्तीत जास्त गोलंदाजीचा सराव करण्याचा प्रयत्न
अश्विनला दुसऱ्या सत्रात एकमेव फलंदाजाला बाद करण्यात यश आले होते. त्याने टॉम लेमनबॉयला ४२ धावांवर माघारी धाडले होते. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आर अश्विनने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला होता. अश्विन या सामन्यात आपल्या गोलंदाजीतील विविधता न दाखवता जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारतीय संघाला २० दिवसांची विश्रांती
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली आहे. यामागचे कारण असे की, येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत भारतीय संघातील खेळाडू मानसिक दृष्ट्या फिट असावेत. म्हणून बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
एका टी२०त ४ रनआऊट, भारतीय महिलांचे लाजबाव क्षेत्ररक्षण; पण खरे श्रेय द्रविडच्या खास व्यक्तीला
चोख प्रत्युत्तर! ब्रेक डान्सच्या बदल्यात ब्रेक डान्स, बांगलादेश-झिम्बाब्वे कसोटीतील लक्षवेधी प्रसंग
गांगुलीच्या निरोप सामन्यात धोनीने केलं असं काही, ‘दादा’ला अनावर झाले अश्रू; वाचा किस्सा