भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आज (०६ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. एका डावाची आघाडी घेत २५ धावांनी भारताने हा सामना जिंकला. सोबतच ३-१ ने कसोटी मालिकेतही विजयी झेंडे रोवले. दरम्यान फलंदाजी आणि गोलंदाजीसह भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आर अश्विन याला मानाचा मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. यासह अश्विनने कसोटीतील मोठ्या विक्रमात अव्वलस्थान पटकावले आहे.
भारतीय अष्टपैलू अश्विनने मालिकेतील चारही सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले. यावेळी हातखंडा असलेल्या गोलंदाजीत त्याने तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. यात एक- दोन नव्हे तर तीन फाइव्ह विकेट हॉल्सचा समावेश आहे. तसेच फलंदाजी करताना एकूण १८९ धावा केल्या. यात दुसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या १०६ धावांच्या झुंजार शतकाचा समावेश आहे.
संपूर्ण कसोटी मालिकेतील अश्विनच्या या लक्षणीय कामगिरीला पाहता त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. हा अश्विनचा कसोटी कारकिर्दीतील पहिलावहिला नव्हे तर आठवा मालिकावीर पुरस्कार आहे. यासह अश्विन कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर ठरणारा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
याबाबतीत त्याने भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. त्यांनी प्रत्येकी ५ वेळा हा पुरस्कार मिळवला होता. तसेच परदेशी दिग्गज रिचर्ड हेडली, शेन वॉर्न आणि इमरान खान यांची बरोबरी आहे.
कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर ठरेलेले भारतीय क्रिकेटपटू
८ वेळा- आर अश्विन
५ वेळा- सचिन तेंडूलकर
५ वेळा- विरेंद्र सेहवाग
कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर ठरेलेले क्रिकेटपटू
११ वेळा- मुथैय्या मुरलीधरन
९ वेळा- जॅक्स कॅलीस
८ वेळा- रिचर्ड हेडली, शेन वॉर्न, इमरान खान, आर अश्विन
महत्त्वाच्या बातम्या-
भावा हे काय केलंस! विराटचा थ्रो लागला रूटच्या नाजुक भागी, मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल
अश्विन जिथे विक्रम तिथे! दुसऱ्या डावात बळींचा पंचक, दिग्गजांच्या मांदियाळीत आला ‘या’ स्थानी
कसोटी चॅम्पियनशीप: भारताचं फायनलचं तिकीट पक्क! लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध करणार दोन हात