---Advertisement---

भारतात नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा अश्विन दुसरा, पाहा पहिलं नाव कुणाचं

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 12:58 PM
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या इंग्लंडचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून धडाकेबाज फलंदाजी करत त्यांनी पहिल्या डावात यजमान भारतापुढे ५७९ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने जेम्स अंडरसनला त्रिफळाचित करत इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला. यासह अश्विनने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

अश्विनने या सामन्यापुर्वी आशिया खंडात कसोटीतील एकूण २९७ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने सर्वप्रथम सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद केले. त्यानंतर ऑली पोपला पायचित केले. शेवटी जेम्स अंडरसनची दांडी उडवत त्याने आशिया खंडातील ३०० वी विकेट काढली. यासह अश्विनने हरभजनच्या आशिया खंडात ३०० कसोटी विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या विक्रमाच्या यादीत माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे अव्वल स्थानावर विराजमान आहेत. त्यांनी आशिया खंडात भारताकडून सर्वाधिक ४१९ कसोटी विकेट्स घेतल्या होत्या.

हेच जर, जगातील सर्व आंतरराष्ट्रीय गोलंदाजांबद्दल पाहायचे झाले तर, श्रीलंकन दिग्गज मुथैय्या मुरलीधरन प्रथम स्थानावर आहे. त्याने आशिया खंडात सर्वाधिक ६१२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर कुंबळेंचा दुसरा आणि श्रीलंकाचा माजी गोलंदाज रंगना हेराथचा तिसरा क्रमांक लागतो. तर अश्विन आणि हरभजन संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत.

आशिया खंडात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज

६१२ विकेट्स- मुथैय्या मुरलीधरन
४१९ विकेट्स- अनिल कुंबळे
३५४ विकेट्स- रंगना हेराथ
३०० विकेट्स- आर अश्विन आणि हरभजन सिंग

महत्त्वाच्या बातम्या-

INDvENG Test Live : तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर भारताच्या २ बाद ५९ धावा, आर्चरने केले रोहित, गिलला बाद

टीम इंडियाची सर्वात क्यूट चियरलीडर पाहिली का?, एका तासातच फोटो झालाय भन्नाट व्हायरल

शतक सोडा द्विशतक केलं, तरीही धोनीच्या ‘या’ विक्रमाला धक्काही नाही लावू शकला रुट 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---