बुधवारी (दि. 1 मार्च) आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने इतिहास रचला आहे. मागील आठवड्यात आयसीसीने गोलंदाजांची कसोटी क्रमवारी जाहीर केली होती. त्यावेळी 40 वर्षीय जेम्स अँडरसन याने अव्वल क्रमांक पटकावला होता. मात्र, या आठवड्यात अश्विनने अँडरसनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे.
आर अश्विन (R Ashwin) हा 864 गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. तसेच, जेम्स अँडरसन (James Anderson) हा 859 गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) 858 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
👑 A new No.1 👑
India's star spinner has replaced James Anderson at the top of the @MRFWorldwide ICC Men's Test Bowling Rankings 👏
Details 👇https://t.co/sUXyBrb71k
— ICC (@ICC) March 1, 2023
अश्विनचा पराक्रम
आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत (ICC Test Rankings) भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन हा जगातील अव्वल गोलदाज बनला आहे. तो सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा भाग आहे. 36 वर्षीय आर अश्विनने यापूर्वी 2015मध्ये अव्वल कसोटी गोलंदाज बनण्याचा मान पटकावला होता. तेव्हापासून अनेकदा तो अव्वलस्थानी विराजमान झाला. अलीकडेच अश्विनने घेतलेल्या 6 विकेट्सच्या कामगिरीमुळे तो गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही जलवा कायम
आर अश्विन हा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)मधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळतोय. त्याच्या हातात आणखी एक सामना आहे. अशात तो या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल कसोटी गोलंदाजाचे स्थान आपल्या नावावर कायम ठेवू शकतो. अश्विन गोलंदाजीसोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच, गोलंदाजाच्या यादीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा 8व्या स्थानी आला आहे. जडेजाने दिल्ली कसोटीत 10 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
आर अश्विनची शानदार आकडेवारी
आर अश्विन याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 463 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. अश्विनने भारतीय संघासाठी 113 वनडे आणि 65 टी20 सामनेही खेळले आहेत. वनडेत त्याच्या नावावर 151 विकेट्स, तर टी20त 72 विकेट्सचा समावेश आहे. (R Ashwin becomes the number 1 bowler in ICC Test ranking)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम
लायनचा नाद सोड बाबा! ‘या’ भारतीय धुरंधराला तब्बल 12 वेळा गमवावी लागलीय विकेट, कोण आहे तो कमनशिबी?