विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला बीसीसीआयने २० दिवसांची सुट्टी दिली आहे. भारतीय संघातील खेळाडू या सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत; तर भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन मौज मजा न करता इंग्लंड संघाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी कसून तयारी करताना दिसत आहे.
तो सध्या इंग्लंडमधील काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु या सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. ही नक्कीच भारतीय संघासाठी चिंताजनक बाब असणार आहे.
काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्रे आणि समरसेट यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात आर अश्विनला देखील संधी देण्यात आली आहे. परंतु या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ४३ षटके म्हणजे २५८ गोलंदाजी केली. यामध्ये त्याला अवघा एक गडी बाद करण्यात यश आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठणाऱ्या अश्विनने या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याने ९९ धावा खर्च करत केवळ १ फलंदाज बाद केला आहे. त्याने पहिल्याच दिवशी टॉम लेमनबॉयला ४२ धावांवर माघारी धाडले होते. ( R Ashwin bowls 43 overs for surrey and picks up just 1 wicket in county championship)
डरहममध्ये एकत्रित येणार भारतीय संघ
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत आर अश्विन भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकतो. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपल्यानंतर १५ जुलैला भारतीय संघातील सर्व सदस्य डरहममध्ये एकत्र येणार आहेत. भारतीय संघाच्या सराव शिबिराला लवकरच प्रारंभ होणार आहे. ही कसोटी मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलीच मालिका असणार आहे.
इंग्लंडमध्ये ५ गडी बाद करण्यास अश्विन ठरला अपयशी
आर अश्विन सध्या विश्व क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने ७९ कसोटी सामन्यात २५ च्या सरासरीने ४१३ गडी बाद केले आहेत. तसेच ३० वेळेस त्याला ५ गडी आणि ७ वेळेस त्याला १० गडी बाद करण्यात यश आले आहे. इतकेच नव्हे तर, त्याने २८ च्या सरासरीने २६८५ धावा देखील केल्या आहेत. यामध्ये ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु इंग्लंडमध्ये अश्विनला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याने इंग्लंडमध्ये ७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला अवघे १८ गडी बाद करण्यात यश आले आहे. मुख्य बाब म्हणजे त्याला एकदाही ५ गडी बाद करण्यात यश आले नाही. इंग्लंडमध्ये ६२ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यात पंड्या बंधू आणि चाहर बंधू एकत्र खेळल्यास तब्बल ८७ वर्षांनी होणार ‘असा’ कारनामा
धोनी गुपचूप चण्याच्या गाड्यावर ठेवून आला तब्बल ३५ हजार रुपये, ‘हे’ होते कारण
वनडे क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ७ संघांच्या ‘या’ आहे कर्णधार-उपकर्णधारांच्या जोड्या