भारत विरुद्ध इंग्लंड संघांदरम्यान चेन्नईत चालू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रंगतदार स्थितीत आहे. दोन्ही संघाचे पहिल्या डावातील खेळ संपले असून भारताने १९५ धावांनी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३० धावांचे लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ अवघ्या १३४ धावांवर गारद झाला. यादरम्यान भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने पुन्हा एकदा बेन स्टोक्स याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फासले.
इंग्लंडचा संघनायक जो रुटची विकेट पडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर स्टोक्स फलंदाजीला आला होता. ५२.९४ च्या सरासरीने सरासरीने फलंदाजी करताना स्टोक्सने ३४ चेंडूत १८ धावा काढल्या. या खेळीदरम्यान त्याने एक चौकार मारला. अखेर डावातील २३.२ षटकात अश्विनने जबरदस्त चेंडू टाकत स्टोक्सचा त्रिफळा उडवला.
महत्त्वाचे म्हणजे, अश्विनने स्टोक्सला बाद करण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने स्टोक्सला आपले शिकार बनवले होते. अशाप्रकारे अश्विनने आजवर स्टोक्सला कसोटीत सर्वाधिकवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याने सर्वाधिक ९ वेळा स्टोक्सला बाद केले आहे.
अश्विननंतर स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम नॅथन लायनने केला आहे. त्याने ६ वेळा स्टोक्सला आपले गिऱ्हाईक बनवले आहे. तर केमार रोच आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी ५ वेळा स्टोक्सची काढली आहे.
बेन स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज-
९ वेळा- आर अश्विन
६ वेळा- नॅथन लायन
५ वेळा- केमार रोच आणि दिलरुवान परेरा
महत्त्वाच्या बातम्या-
“या सामन्यात टॉस जिंकला म्हणूनच भारत मजबूत स्थितीत, अन्यथा…”, माजी इंग्लिश खेळाडूने पुन्हा डिवचले
वाह रे अश्विन ! २०१५ पासून गाजवतोय कसोटी क्रिकेट, आकडे पाहून थक्क व्हाल
शाब्बास अज्जू! चित्त्याच्या चपळाईने डाइव्ह मारत रहाणेने टिपला भन्नाट झेल, एकदा व्हिडिओ पाहाच