---Advertisement---

अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी

On: रविवार, मार्च 6, 2022 12:35 PM
R-Ashwin-Kapil-Dev
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शुक्रवारपासून (४ मार्च) मोहाली येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) खेळला जात आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत हा कसोटी सामना खेळला जात असल्याने उभय संघ हा सामना जिंकत गुणतालिकेतील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेला ५७५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले आहे. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाज या आव्हानाचा बचाव करताना शानदार गोलंदाजी करताना दिसले. यादरम्यान भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने मोठा विक्रम केला आहे. अश्विनने भारताचे माजी अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांना कसोटीतील मोठ्या विक्रमात (R Ashwin Overtakes Kapil Dev) मागे सोडले आहे.

भारताच्या ५७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला विशेष प्रदर्शन करता आले नाही. त्यांची सलामी जोडी केवळ ४८ धावांवर तुटली. अश्विनने श्रीलंकेचा सलामीवीर लहिरू थिरीमाने याला वैयक्तिक १७ धावांवर पायचित करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर नुकताच फलंदाजीला आलेला धनंजया डि सिल्वाला त्याने एका धावेवर आपला शिकार बनवले. या डावात तो दोनच विकेट्स घेऊ शकला.

हेही वाचा- भारीच! स्नेह राणा-पुजा वस्त्राकर जोडीची पाकिस्तानविरुद्ध कमाल, एकाच वेळी दोन विश्वविक्रम नावावर

त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात १७४ धावांवर गारद झालेल्या श्रीलंकेला फॉलोअप दिला. त्यामुळे पुढील डावात अश्विनने अजून २ विकेट्स घेतल्या. सर्वप्रथम त्याने सलामीवीर लहिरू थिरिमानेला शून्य धावांवर झेलबाद केले. त्यानंतर पथुम निसांकाला ६ धावांवर पव्हेलियनला पाठवत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून ४ विकेट्स घेत त्याने सर्वाधिक कसोटी विकेट्सच्या विक्रमात माजी दिग्गज वेगवान गोलंदाज कपिल देव यांना मागे टाकले आहे. १९७८ ते १९९४ दरम्यान १३१ कसोटी सामने खेळत कपिल देव यांनी ४३४ विकेट्स घेतल्या होत्या. ते भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे दुसरे गोलंदाज होते. अश्विनने आता ४३४ विकेट्सचा आकडा गाठत कपिल देव यांची बरोबरी केली आहे. या यादीत अनिल कुंबळे ६१९ विकेट्ससह अव्वलस्थानी आहेत.

अश्विनने मोडला रिचर्ड हेडलीचा विक्रम
भलेही अश्विन अद्याप कपिल देव यांना कसोटी विकेट्सच्या बाबतीत मागे टाकू शकला नसला, तरीही त्याने न्यूझीलंडचे दिग्गज गोलंदाज सर रिचर्ड हेडली यांना मागे टाकले आहे. त्यांनी कसोटी कारकिर्दीत ४३१ विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनने लहिरू थिरीमानेची विकेट घेत हेडलींचा विक्रम मोडला होता. तसेच तो रंगणा हेराथ (४३३ विकेट्स) यांच्यावरही वरचढ ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO: इमाम उल हकने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धूव्वा उडवत ठोकले शतक, मिशेल स्टार्कही हतबल

‘फिरकीचा जादूगार’ वॉर्नची पर्सनल लाईफ नेहमीच राहिलीय चर्चेत, लग्नानंतरही ३ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय नाव

शासकीय इतमामात होणार वॉर्नवर अंत्यसंस्कार; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडूनही श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---