---Advertisement---

पेनच्या बडबडीला अश्विनचे सडेतोड उत्तर! चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 5:30 PM
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना म्हटलं की स्लेजिंग होणार, हे समीकरणच झाले आह. कारण मागील अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या स्लेजिंगसाठी प्रसिद्ध आहेत. नुसत्याच सिडनी येथे पार पडलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियन खेळाडू स्लेजिंग करताना दिसले. केवळ खेळाडूच नाही तर ऑस्ट्रिलियाचा कर्णधार टीम पेनही स्लेजिंग करताना दिसल्याने सध्या त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत.

नक्की झाले काय –

सिडनी कसोटीतील शेवटच्या दिवशीचा खेळ सुरु असताना भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विन आणि हनुमा विहारी फलंदाजी करत होते. यावेळी हे दोघेही बाद होण्याचे नाव घेत नव्हते. त्याचवेळी पेनने आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्लेजिंग करणे सुरु केले. याचदरम्यान पेन आणि आर अश्विनमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले.

यष्टीमागे उभा असलेला पेन आर अश्विनला म्हणाला, ‘गॅबा (ब्रिस्बेन) येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत तुला पाहण्याची उत्सुकता आहे.’ अर्थात पेनला म्हणायचे असावे की चौथ्या कसोटीत आम्ही तुमच्यावर वर्चस्व ठेवू. पण अश्विननेही पेनचे ऐकून न घेता त्याला प्रतिउत्तर दिले. अश्विन म्हणाला, ‘जसे आम्हाला तुला भारतात पाहण्याची इच्छा आहे, कदाचीत ती तुझी कारकिर्दीतील शेवटची मालिका असेल.’ अश्विनने यातून सन २०१८ ला झालेल्या चेंडू छेडछाडीच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने नेतृत्व सांभाळलेल्या पेनला त्याच्या वयाची आठवण करुन देत डिवचले.

यानंतरही पेन शांत बसला नाही. त्याने अश्विनला विचारले, ‘कदाचीत तू इथला पण निवडकर्ता आहे का?’ तो पुढे म्हणाला, ‘कमीत कमी माझे संघसहकाऱ्यांना मी आवडतो. मला तुझ्यापेक्षा अधिक भारतीय मित्र आहेत.”

अखेर अश्विन फलंदाजी करणं थांबवत त्याला म्हणाला, ‘तुझे झाले की सांग.’ यावर पेन म्हणाला, ‘मी दिवसभर बडबड करत राहिल.’ त्यानंतर अश्विनने पेनची बडबड थांबेपर्यंत फलंदाजी करण्यास नकार दिला. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या नॅथन लायन चेंडू टाकण्याची वाट पाहात असताना अश्विन त्याला म्हणाला, ‘तुमचाच संघसहकारी आहे, माझ्यामुळे खेळ थांबलेला नाही.’

विहारीसाठीही पेनचे स्लेजिंग – 

आर अश्विन आणि हनुमा विहारी तिसऱ्या सत्रात फलंदाजी करत असताना विहारीला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत होता. त्यामुळे विहारीवर उपचार करण्यासाठी भारताचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला होता. त्यांनी त्याला तपासले आणि त्यानंतर विहारीने पुढे कायम खेळण्याचा निर्णय घेतला. तो मांडिला ‘थाय पॅड’ बांधत असताना अश्विन वाट पाहात उभा होता. त्यावेळी वैतागलेल्या पेनने मोठ्या ओरडत म्हटले की ‘हे विचित्र आहे. असेच खेळणार आहे, खरंच”

पेनने दुखापतग्रस्त विहारीलाही डिवचल्याने त्याच्याबद्दल चाहत्यांच्या अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी म्हटले आहे की पेनने खिलाडूवृत्ती दाखवली नाही. तर काहींनी पेनबद्दल कोणताही सन्मान वाटत नसल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/swing_drive/status/1348519370557845505

https://twitter.com/JasB_Lee/status/1348519393714606083

https://twitter.com/6eChaithu/status/1348593106271182848

लॅब्यूशानेने डिवचले –

पेनच्या आधी भारतीय संघाच्या पहिल्या डावात मार्नस लॅब्युशानेने शुबमन गिल आणि रोहित शर्माला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. लॅब्यूशाने गिलला म्हटले होते की “तुझा आवडता खेळाडू कोण आहे?”. यावर गिल उत्तर देत म्हणाला की, “मी या प्रश्नाचे उत्तर तुला नंतर देईल.” त्यानंतर लॅब्यूशाने म्हणाला की, “सचिन? तू विराटला मानतो का?” दरम्यान त्यांच्यातील संभाषणाचा आवाज स्टंप माईक्समध्ये कैद झाला होता.

तसेच लॅब्यूशानेने रोहितलाही विचारले होते की “तू क्वारंटाईनमध्ये काय केलेस.” पण रोहितने याकडे दुर्लक्ष केले होते.

सिडनी कसोटी सामना अनिर्णित – 

तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला या सामन्यात विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले होते. पण पाचव्या दिवसाचा खेळ संपपर्यंत भारताने ५ बाद ३३८ धावा केल्या होत्या, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

ब्रिस्बेन कसोटी सामना खेळण्यावर होते प्रश्नचिन्ह – 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे चौथा कसोटी सामना खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. कारण सध्या सिडनीमध्ये कोरोनाची वाढलेली प्रकरणे लक्षात घेता तेथून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला क्वारंटाईन व्हावे लागते. या नियमामुळे भारतीय संघाने सिडनीतील कसोटीनंतर ब्रिस्बेनला जाण्यास नकार दिला होता. मात्र आता असे वृत्त समोर येत आहे की बीसीसीआयने ब्रिस्बेन येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी घातलेल्या अनेक अटी ऑस्ट्रेलियाने मान्य केल्या आहेत, त्यामुळे ब्रिस्बेन येथे चौथा सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“हा निकाल पचवणे अवघड”, सिडनी कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया

“त्याला पाठीच्या दुखापतीने भयंकर वेदना होत होत्या”, अश्विनच्या पत्नीने केला खुलासा

ड्रीम ११: फक्त कन्यारत्न असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---