---Advertisement---

‘मुलांना बीपासून सुरू होणाऱ्या कोणत्या गोष्टीची जास्त गरज?’, पोरीचा प्रश्न अन् अश्विनचं भन्नाट उत्तर; वाचा

On: सोमवार, फेब्रुवारी 6, 2023 7:01 PM
R-Ashwin
---Advertisement---

भारतीय संघातील अनेक खेळाडू सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. त्यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याचाही समावेश आहे. अश्विन हा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जाणीवपूर्वक वापर करतो. तो फोटो आणि व्हिडिओ शेअर करतोच, पण त्यासोबतच चाहत्यांच्या प्रश्नांवरही तितक्याच हुशारीने उत्तरही देतो. असेच त्याने ट्विटरवर एका मुलीने विचारलेल्या प्रश्नावर भन्नाट प्रतिक्रिया दिली. त्याच्या प्रतिक्रियेवर नेटकरीही त्याची प्रशंसा करताना दिसत आहेत.

मुलीचा प्रश्न
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिमा नावाच्या एका महिला युजरने ट्वीट केले. तिने तिच्या ट्वीटमध्ये प्रश्न विचारत लिहिले की, “मुलांना फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती गोष्ट ‘बी’ या अक्षरापासून सुरू होते.” या प्रश्नावर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कुणी ‘बॅटमॅन’ म्हणालं, तर कुणी ‘बिर्याणी’ म्हणालं. मात्र, भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने जी प्रतिक्रिया दिली, त्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

https://twitter.com/thecrazzyycat/status/1622205347695046656

आर अश्विनची प्रतिक्रिया
अश्विन याने त्या महिला युजरचे ट्वीट रिट्विट करत लिहिले की, “बॉर्डर-गावसकर ट्रॉफी.” (Border-Gavaskar Trophy) यामध्ये त्याने ट्रॉफी आणि हसणाऱ्या चेहऱ्याचा इमोजीचाही समावेश केला.

https://twitter.com/ashwinravi99/status/1622533245010325505

अश्विनच्या या ट्वीटला 20 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच, 500 हून अधिक युजर्सनी त्याच्या ट्वीटवर कमेंट्स केल्या आहेत. त्याचे ट्वीट पाहून अनेकांनी त्याची प्रशंसा केली. एका युजरने कमेंट करत म्हटले की, “भारी उत्तर अण्णा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “फिरकीच्या जाळ्यात फसवलं.”

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांसोबतच भारतीय क्रिकेटपटूही खूपच उत्सुक आहेत. (R Ashwin Hilarious reply to a girl read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाच्या एकाच ट्वीटने देशभरात माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘तुझा आदर आहे, पण तू दलाल…’
आता नाही तर कधी? शुबमन गिलचे आकडे पाहून भज्जीही भारावला, थेट भारताच्या उपकर्णधारालाच केले बाजूला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---