भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने पुढे आहे. या मालिकेदरम्यान भारताचा फिरकीपटू आर अश्विनने मुथैया मुरलीधरननंतर कसोटीत सर्वात जलद ४०० गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच त्याची तुलना काहीवेळा काही दिग्गज फिरकीपटूंबरोबर जाते. अशातच माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने आर अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यात तुलना करत सर्वश्रेष्ठ गोलंदाज कोण आहे, याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
गंभीर म्हणाला, “दोन वेगळ्या काळातील खेळाडूंची तुलना करणे खूप कठीण काम असते. परंतु यावेळी मला असे वाटते की, जे काही आपण पाहत आहोत त्यावरून हरभजन सिंगला अधिक गुण देत मी त्याला श्रेष्ठ मानतो. अश्विन या काळातील जगातील सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाज आहे. परंतु, जर मी त्याची तुलना हरभजन सिंग सोबत केली तर त्यावेळी अशा प्रकारची खेळपट्टी नव्हती आणि खेळाडूंना डीआरएस देखील उपलब्ध नव्हता.”
तसेच गंभीर पुढे म्हणाला की,” हरभजन सिंगला दुसरा (फिरकी गोलंदाजीचा प्रकार) चेंडू करण्याचा खूप फायदा होत होता. अश्विन हा चेंडू टाकू शकत नाही. कारण अश्विन हा बोटांनी चेंडू फिरवतो. परंतु अश्विन च्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. हे खूप कठीण आहे पण मला वाटते की हरभजन सिंग आज ही श्रेष्ठ आहे. आणि संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर अश्विन, हरभजनच्या तुलनेत श्रेष्ठ आहे.
हरभजन सिंगने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण १०३ सामने खेळले आहेत यात त्याने ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २३६ एकदिवसीय सामन्यात २६९ विकेट्स घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा यादीत हरभजन सिंग हा अनिल कुंबळे नंतर दुसरा फिरकी गोलंदाज आहे. तसेच अश्विनला हरभजन सिंगचा विक्रम मोडण्यासाठी अजून १७ गडी बाद करायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जोकोविचच ‘अव्वल’! ३१० व्या आठड्यात पहिल्या क्रमांकावर कायम राहात फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
रोहितसह ‘हे’ खेळाडू होऊ शकतात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर
हरभजन सिंग बनला ‘ऍक्शन हिरो’! ‘या’ साऊथ फिल्ममध्ये दिसणार फायटिंग करताना, पाहा टीझर