आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. गेल्या २ सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. परंतु अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात जवळपास ५ वर्षानंतर पुनरागमन करत असलेल्या आर अश्विनने देखील लक्षवेधी कामगिरी केली.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी आर अश्विनला संधी दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण गेल्या ५ वर्षांपासून तो फक्त कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येत होता. त्यामुळे त्याची जेव्हा निवड झाली, तेव्हापासून चाहते त्याला निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. परंतु पहिल्या दोन सामन्यात विराट कोहलीने आर अश्विनऐवजी वरूण चक्रवर्तीला संधी दिली होती. या दोन्ही सामन्यात वरूण चक्रवर्ती पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामूळे वरूण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनला संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले.
तब्बल १५७७ दिवसांनंतर आर अश्विन निळ्या रंगांच्या जर्सीमध्ये खेळताना दिसून आला. अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकात केवळ १४ धावा खर्च केल्या आणि २ महत्वपूर्ण गडी बाद केले. या स्पेलमध्ये त्याला अफगानिस्तानच्या फलंदाजांनी एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. त्याची ही गोलंदाजी पाहून कोणीच असे म्हणणार नाही की, तो ५ वर्षानंतर पुनरागमन करत आहे.
https://www.instagram.com/reel/CV0lI-qonBa/?utm_source=ig_web_button_share_sheet
या विजयात भारतीय संघाच्या फिरकी जोडीचा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळाला. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने अप्रतिम गोलंदाजी केली. आर अश्विनने २ गडी बाद केले तर रवींद्र जडेजाला १ गडी बाद करण्यात यश आले.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाला ७ बाद १४४ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. अफगाणिस्तान सामन्यास तालिबानी नेत्याने लावली हजेरी, व्हिडिओ पोस्ट करत दिला संदेश
हीच आहे ‘हिटमॅन’ची ताकद! रोहितचा ढासू षटकार, चेंडू जाऊन पडला थेट डगआऊटमधील विराटपाशी
“दोन सामने हरलो, याचा अर्थ असा नाही की आम्ही खेळाडू वाईट आहोत किंवा आमचा लीडर वाईट आहे”






