विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ‘कसोटी किंग’ होण्यासाठी अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघाने मंगळवारी (१५ जून) १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. या संघात फिरकी गोलंदाज आर अश्विनला देखील स्थान देण्यात आले आहे. अशातच सोशल मीडियावर त्याचा सराव करत असतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या १५ सदस्यांच्या संघात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. परंतु असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, जर भारतीय संघ एक फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला तर तो आर अश्विन असेल. यामागचे कारण असे की, न्यूझीलंड संघात डाव्या हाताचे फलंदाज आहेत. डाव्या हाताच्या फलंदाजांना लवकर बाद करण्याचे कौशल्य आर अश्विनकडे आहे. त्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. (R Ashwin practising hard for WTC Final watch video)
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचे लक्ष केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. तसेच या स्लो मोशन व्हिडिओवर त्याने कॅप्शन म्हणून, “मेहनतीला पर्याय नाही” असे लिहिले आहे. अश्विनने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत, मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. या मालिकेत त्याने ३२ गडी बाद केले होते.
अश्विन आणि जडेजा दोघांना संघात स्थान द्या – सुनील गावसकर
सुनील गावसकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “साउथॅम्प्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ऊन आहे. त्यामुळे खेळपट्टी कोरडी असेल. त्यामुळे अश्विन आणि जडेजा दोघेही खेळू शकतात. दोघेही गोलंदाजीमध्ये संतुलन निर्माण करतात. तसेच फलंदाजीमध्ये ही सखोलता आणतात. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत सर्व काही हवामान आणि खेळपट्टीवर अवलंबून असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
अमेरिका संधीचे प्रवेशद्वार! स्मित पटेलनंतर ‘हा’ खेळाडूही दिसणार अमेरिकेत क्रिकेट खेळताना
लईच भारी! साउथम्प्टनमध्ये दाखल झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने केली पार्टी, वॅग्नर बनला शेफ