भारतीय संघाचा नवनियुक्त एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने काही दिवासंपूर्वी संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे कौतुक केले होते. अश्विनने अलिकडेच मर्यादिक षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. अशात त्याने आता कर्णधार रोहितचे कौतुक केले आहे.
अश्विनच्या मते रोहित शर्मा एक चांगले कर्णधार आहे. तसेच रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी अश्विनची पैसे खर्च करण्याची देखील तयारी आहे.
अश्विनला त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक प्रश्न विचराला गेला. त्याचे उत्तर देताना तो म्हणाला की, “रोहित शर्मा एक चांगला नेता (कर्णधार) आहे. माझ्या मनात एका फलंदाजाच्या रूपात रोहित शर्मासाठी खूप सन्मान आहे. मी त्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी पैसे देखील खर्च करू शकतो. एक घटना जी माझ्या लक्षात आहे, ती ही आहे की, त्याने मला भारताच्या १७ वर्षाखालील संघाच्या एका सामन्यात रिप्लेस केले होते, कारण मी त्यावेळी एका फलंदाजाच्या रूपात खेळायचो.”
तत्पूर्वी, एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्माने बॅकस्टेज विथ बोरिया कार्यक्रमात मुलाखत दिली होती, यावेळी त्याने अश्विनचे कौतुक केले होते. रोहित म्हणाला होता की, “अश्विन तुम्हाला ती लवचीकता देतो, ज्यामुळे तुम्ही त्याला पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये वापरू शकता. तो एक असा अष्टपैलू गोलंदाज आहे, ज्याला मी कुठेही, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करायला लावू शकतो. त्याच्यासारखा गोलंदाज असणे संघासाठी कधीही महत्वाचे असते.”
नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकातून अश्विनने भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यापूर्वी मागच्या जवळपास चार वर्षांपासून तो मर्यादित षटकांचे क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला नव्हता. यादरम्यान तो कसोटी क्रिकेट खेळत होता, पण विराटच्या नेतृत्वातील संघात त्याला टी२० आणि एकदिवसीय संघात संधी मिळाली नव्हती. पण, नंतर टी२० विश्वचषकातून यावर्षी अश्विनने ४ वर्षांनी टी२० भारतीय संघात पूनरागमन केले.
महत्वाच्या बातम्या –
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र उपांत्य फेरीत