भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू आहे. उभय संघातील दुसरा कसोटी सामना सध्या रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. भारताचा शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) याने सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याचे प्रदर्शन पाहून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि शार्दुल यांच्यातील चर्चा स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाली आहे.
जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी देखील गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. परंतु भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिक सात विकेट्स घेतल्या आणि केवळ ६१ धावा खर्च केल्या. शार्दुलने त्याच्या पाच विकेट्स पूर्ण करताच रविचंद्रन अश्विन त्याच्याकडे गेला आणि जे काही बोलला, ते सर्व स्टंपमाइकमध्ये रेकॉर्ड झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
शार्दुलची गोलंदाजी पाहून अश्विन त्याच्या जवळ येऊन म्हणाला की, “तू कोण आहे यार? अखेर यांनी तुला कुठून आणले आहे? जेव्हा कधी गोलंदाजी करतो, विकेट पडते.” अश्विनने उच्चारलेले हे शब्द अगदी खरे आहेत. कारण फक्त दक्षिण अफ्रिकेविरुद्ध या मालिकेतच नाही, तर जेव्हा-जेव्हा शार्दुल ठाकुर भारतीय संघात सामील असतो, तेव्हा-तेव्हा त्याने विरोधी संघातील फलंदाजांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
Just was about to tag you😂😂 pic.twitter.com/WGf0WEL0dP
— Jacob Richard (@jacobrich07) January 4, 2022
हेही वाचा- सुट्टीचा आनंद घेत शार्दुल-अश्विनने खोलली मजेदार प्रसंगांची पोतडी; पाहा व्हिडिओ
दरम्यान, उभय संघातील सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण संघाला त्याचा फायदा घेता आला नाही. पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या २०२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेची अवस्था देखील भारताप्रमाणेच पाहायला मिळाली. दक्षिण अफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात २२९ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने २६६ धावा करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
Video: जेव्हा बुमराहने अश्विनच्या गोलंदाजी ऍक्शनची केली नक्कल, फिरकीपटूही पाहून झाला लोटपोट
एकेकाळी एअर फोर्ससाठी खेळायचा व्हॉलीबॉल आता क्रिकेटर बनून बांगलादेशला मिळवून दिला ऐतिहासिक विजय
SAvsIND, 2nd Test, Live: लंचब्रेकपर्यंत भारताकडे १६१ धावांची आघाडी, ६ फलंदाज परतलेत तंबुत
व्हिडिओ पाहा –