भारतीय क्रिकेट संघाला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्यातील सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ४ राखीव खेळाडूंसह १८ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या कसोटी मालिकेसाठी सर्व भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने एक भन्नाट असा व्हिडिओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हिडिओत अश्विन गोलंदाजीचा किंवा फलंदाजीचा सराव करत नसून तो एका तमिळ गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. अश्विनला या गाण्यावर डान्स करण्यासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि भारतीय संघाचे डाटा ऍनालिस्ट (Team India Data Analyst) हरी प्रसाद मोहन (Hari Prasad Mohan) यांचीही साथ मिळाली आहे.
मूळचे तमिळनाडूचे असणारे हे भारतीय क्रिकेटपटू शिवकार्तिकेयन (Sivakarthikeyan) या तमिळ अभिनेत्याच्या चेल्लमा (Chellamaa) या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. या व्हिडिओत सुरुवातीला अश्विन आणि सुंदर नाचताना दिसतात. यावेळी डाटा ऍनालिस्ट मोहन मात्र मागे बसून त्यांना नाचताना पाहात असतो. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी त्याची एन्ट्री होते. तो अश्विन आणि सुंदरच्या मधून येतो आणि त्यांच्या व्हिडिओचा शेवट होतो.
त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ अश्विनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये, ‘लाँग टाईम पेंडिंग..!’ असे लिहित सुंदर आणि मोहन यांना टॅग केले आहे. याबरोबरच पुढे लिहिताना त्याने तमिळ अभिनेता शिवाकार्तिकेयन म्हणजेच एसकेलाही टॅग केले आहे.
https://www.instagram.com/reel/CXdd3d1DvHB/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारताच्या या अष्टपैलू खेळाडूंना अशाप्रकारे डान्स करताना पाहून चाहते मात्र भरपूर खुश झाले आहेत. अनेकांच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने तर, हा व्हिडिओ पाहून ‘शिखर धवन म्हणत असेल, मला नाही बोलावले तुम्ही’, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण
ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर, ‘हे’ खेळाडू दुसऱ्यांदा खेळणार स्पर्धा
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय