भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा (pragyan ojha) याने भारतीय संघातील सध्याचे दोन दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) यांच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ जेव्हा-जेव्हा विदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा रविचंद्रन अश्विनपेक्षा जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. आता ओझाने यामागचे मुळ कारण स्पष्ट केले.
अश्विनचे आतापर्यंतचे भारतातील प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विकेट्स या भारतीय धरतीवर मिळवल्या आहेत. विदेशात अश्विनने भारताच्या तुलनेत सामान्य प्रदर्शन केले आहे. त्यामुळे विदेशात खेळताना जडेजाला अनेकदा त्याच्यापेक्षा जास्त महत्व दिले जाते. जडेजाला जास्त महत्व मिळण्यामागचे कारण प्रज्ञान ओझाने सांगितले आहे. हे स्पष्टिरकरण देताना त्याने हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे या दिग्गजांच्या जोडीचे उदाहरण दिले.
ओझाने आकाश चोप्रांचा यूट्यूब चॅनवल बोलताना याविषयी त्याचे मत मांडले आहे. तो म्हणाला की, “जेव्हा हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे खेळायचे, तेव्हा संघाचा विचार खूप वेगळा असायचा. संघ व्यवस्थापनाला त्यावेळी नेहमी स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज हवा होता. कुंबळे आणि हरभजनच्या रूपात भारताकडे दोन स्पेशलिस्ट होते. दोन्ही गोलंदाज अप्रतिम होते. त्यामुळे हरभजन तेव्हा खेळायचा, जेव्हा विरोधी संघाकडे जास्त डावखुरे फलंदाज असायचे. तसेच कुंबळेला संघाचा सर्वात महत्वाचा फिरकी गोलंदाज मानले जात होते.”
“आता व्यवस्थापनाचा विचार बदलला आहे. कर्णधाराला आता पाच फलंदाजांसह मैदानात जायचे आहे. तुम्ही पाच फलंदाज आणि जडेजासोबत जाता, जो विदेशी परिस्थितीत सतत ३०-४० आणि भारतात ६०, ७० आणि ८० धावा करू शकतो. भारतात तर दोन्ही फिरकी गोलंदाज एकत्र खेळतात. मात्र, विदेशात जडेजा पुढे निघून जातो. शक्यतो हेच कारण आहे की, अश्विनच्या ऐवजी विदेशी परिस्थितीत त्याला जास्त महत्व दिले जाते.”
दरम्यान, भारतीय संघ आगामी काळात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. रवींद्र जडेजा या विदेशी परिस्थितीत संघासाठी फायदेशीर गोलंदाजी करू शकत होता. पण, दुखापतीमुळे त्याला या संपूर्ण दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचा ‘जबरा फॅन’ आहे खिलाडी कुमार
टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये