बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. विजयासाठी मिळालेले 145 धावांचे लक्ष्य भारताने 47 षटकांत 7 विकेट्स गमावत पूर्ण केले.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात आर अश्विन-श्रेयस अय्यर (R Ashwin & Shreyas Iyer) या भारतीय जोडीने आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. अश्विनने 62 चेंडूत 72 आणि श्रेयसने 46 चेडूत 29 धावा केल्या. अश्विनने या सामन्यात 6 विकेट्स घेत सामनाविजयी खेळी केली. यामुळे तो सामनावीर ठरला, तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) मालिकावीर ठरला. पुजाराने या मालिकेत पहिल्या सामन्यात नाबाद 102 धावा करत एकूण 222 धावा केल्या.
त्याचबरोबर कसोटी क्रिकेटचा इतिहास पाहिला तर बांगलादेशला भारताविरुद्ध आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
Ravichandran Ashwin and Shreyas Iyer's unbeaten 71-run stand take India over the line ✌️#WTC23 | #BANvIND | 📝 https://t.co/ZTCALEDTqb pic.twitter.com/aSdztm13zO
— ICC (@ICC) December 25, 2022
त्तपूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसले, कारण यजमान पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 227 धावसंख्याच उभारू शकला. या डावात भारताकडून उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात रिषभ पंतच्या 93 आणि श्रेयस अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावसंख्या उभारत 87 धावांची आघाडी घेतली होती.
बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचेच वर्चस्व दिसले. या डावात ते केवळ 231 धावसंख्याच उभारू शकले. यामध्ये भारताच्या पाचही गोलंदाजांना विकेट्स मिळाल्या. अक्षर पटेल याने सर्वाधिक अशा 3 तर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. भारताने आधीच आघाडी घेतल्याने विजयाचे लक्ष्य छोटे आणि सोपे होते, मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी ज्याप्रकारे कामगिरी केली त्यावरून भारत हरणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. भारताच्या दुसऱ्या डावात पहिल्या 4 विकेट्स 37 धावसंख्येवरच पडल्या होत्या. तेव्हा अक्षरने उनाडकटच्या साथीने टिकून फलंदाजी करत भारताचा धावफलक हलता ठेवला. त्यानंतर अश्विन आणि अय्यरने खास कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
या मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांनी जिंकला होता. आता दुसरा सामनाही जिंकल्याने भारताने मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेट भेट! सचिनकडून लहान मुलांना ख्रिसमसनिमित्त खास गिफ्ट्स, पाहा व्हिडिओ
…म्हणून ऍलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा पश्चाताप