रविचंद्रन अश्विनने बांग्लादेशविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अष्टपैलू खेळ दाखवला. आर अश्विनने बॅटिंगनंतर गोलंदाजीतही कमाल कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आर अश्विनने पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेत विक्रम केला. कसोटी सामन्यात चार वेळा शतक झळकावणारा आणि किमान एका डावात 5 बळी घेणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
ऑफस्पिनर अश्विन हा जगातील एकमेव खेळाडू आहे. ज्याने एकाच मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा शतक झळकावले आणि पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली. अश्विनने 2021 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध 106 धावा केल्या होत्या आणि 43 धावांत 5 बळी घेतले होते. तर या सामन्यात त्याने 133 चेंडूत 113 धावा केल्या आणि 88 धावांत 6 बळी घेतले.
अश्विन हा भारतासाठी पाच बळी घेणारा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. 17 सप्टेंबर रोजी तो 38 वर्षांचा झाला आणि या वयात भारताचा कोणताही गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 5 बळी घेऊ शकला नाही. अशा परिस्थितीत अश्विनसाठी हा एक विक्रम आहे.
कसोटी सामन्यात शतक आणि पाच बळी घेणारा आर अश्विन हा जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त इयान बोथम आहे. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम पाच वेळा केला आहे. तर अश्विनने आतापर्यंत चार वेळा अशी कामगिरी केली. गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस, शकीब अल हसन आणि रवींद्र जडेजा यांनी कसोटी सामन्यात दोन वेळा शतक आणि पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच बळी घेणारा अश्विन संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 67 वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे, तर आर अश्विनने 37 व्यांदा ही कामगिरी केली आहे. माजी महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्ननेही कसोटी क्रिकेटमध्ये 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अश्विनने कसोटी सामन्यात 36 बळी घेणाऱ्या रिचर्ड हॅडलीला मागे टाकले आहे.
हेही वाचा-
चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय; आर अश्विनचा डबल धमाका, बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!
समित द्रविडचे टीम इंडियासाठी पदार्पण लांबणीवर? ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शानदार विजय
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत अश्विन टॉप-2 मध्ये, तर हा गोलंदाज नंबर-1 वर