भारत विरुद्ध इंग्लंडचा दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात १९५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा केल्या. त्यामुळे चौथ्या डावात इंग्लंडला ४८२ धावांचे जवळपास अशक्यप्राय लक्ष्य मिळाले आहे.
भारताच्या या २८६ धावांमध्ये आश्चर्यकारकरित्या आर अश्विनचे सर्वाधिक मोठा वाटा होता. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सगळेच फलंदाज अडखळत असतांना अश्विनने मात्र आदर्श फलंदाजीचा वस्तुपाठ घालून दिला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावताना त्याने १४८ चेंडूत १०६ धावांची शानदार खेळी उभारली. या खेळीसह महत्वाच्या विक्रमांवरही अश्विनचे नाव कोरल्या गेले.
धोनी-कपिल देवलाही टाकले मागे
या डावात अश्विनने आठव्या क्रमांकावर येऊन शतक झळकावले. यासह आठव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर येऊन त्याने झळकावलेले हे तिसरे शतक झळकावले. भारताकडून आठव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर येऊन खेळाडूंनी केलेल्या सर्वाधिक शतकांमध्ये या तीन शतकांसह अश्विन अव्वल क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी हरभजन सिंग, एमएस धोनी आणि कपिल देव प्रत्येकी दोन शतकांसह पहिल्या स्थानी होते.
Most hundreds in Tests by Indians at No.8 or below:-
3 – R Ashwin
2 – Harbhajan Singh
2 – MS Dhoni
2 – Kapil DevAshwin's all 3 home Test hundreds came at No.8 and all his 2 overseas hundreds came at No.6.#INDvENG
— Kausthub Gudipati (@kaustats) February 15, 2021
याशिवाय अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या जागतिक यादीत अश्विन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी अव्वल स्थानी आहे. व्हेटोरीच्या नावे आठव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर येऊन झळकावलेली पाच शतके आहेत. अश्विनने आजच्या तिसऱ्या शतकासह पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि वेस्ट इंडिजचा विद्यमान अष्टपैलू जेसन होल्डरची बरोबरी केली आहे.
Most Test 100s batting 8 or lower:
Daniel Vettori 5
R. Ashwin 3
Kamran Akmal 3
Jason Holder 3https://t.co/hqqqYOUAOG— Andy Zaltzman (@ZaltzCricket) February 15, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली आहे. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीवर २८६ धावा जोडत भारताने इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने १३ षटकात १ गडी गमावून ४० धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्ध तब्बल ५५ वर्षांनंतर आर अश्विनने करुन दाखवली ही खास कामगिरी
कहर! चेन्नई कसोटीत अश्विनचे शतक अन् सोबतच बळींचा पंचक, याआधी इतक्यांदा केलंय असं