---Advertisement---

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 3:51 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन।  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ही मालिका होण्याआधी अनेक दिग्गजांनी ही मालिका एकतर्फी ऑस्ट्रेलिया जिंकेल असे अंदाज वर्तवले होते. तसेच काहींनी म्हटले होते की विराट कोहली पालकत्व रजेवर गेल्याने भारतासाठी ही मालिका जिंकणे कठीण असेल, असे अंदाज वर्तवणाऱ्या दिग्गजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, मार्क वॉ, ब्रॅड हॅडिन आणि  इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांचा समावेश होता. मात्र या सर्वांचे अंदाज खोटे ठरवत भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. विशेष म्हणजे केवळ विराट कोहलीच नाही, तर या मालिकेदरम्यान अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने मालिका जिंकण्याची करामत करुन दाखवली.

या विजयानंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने एक गमतीशीर ट्विट करत, ज्या दिग्गजांनी भारत ही मालिका पराभूत होईल, असे अंदाज वर्तवले होते, त्यांना चपराक मारली आहे. त्याने ट्विटमध्ये विविध दिग्गजांनी मालिकेदरम्यान वर्तवलेल्या अंदाजांचा फोटो आणि भारतीय संघाचा फोटो शेअर केला असून त्यात लिहिले आहे की ‘LHS ( not = ) RHS ! तुमचाच, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२०-२१. मागील ४ आठवड्यांपासून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.’

ब्रिस्बेनमध्ये असा मिळवला विजय – 

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉर्डर-गावसकर चषकात भारताचे निर्विवाद वर्चस्व, तब्बल ‘इतक्या’ वेळा जिंकली आहे मालिका

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे एबी डिविलियर्सकडून खास कौतुक, म्हणाला…

‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---