चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी आर अश्विनने कित्येक विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला. एकाच सामन्यात पाच विकेट्स आणि शतक झळकवण्याचा पराक्रम अश्विनने या सामन्यात केला आहे. आतापर्यंत चौथ्यांदा त्याने अशी कामगिरी केली असून भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकले आहे. अश्विनच्या या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अश्विनच्या या कामगिरीवर त्याची पत्नी प्रिथी सुद्धा भलतीच खुश आहे.
प्रिथीने अश्विनच्या शानदार खेळीनंतर ट्विट करून लिहिले आहे की, ‘माझा पती सर्वांना ट्रोल करत आहे.’ तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊन चाहत्यांना देखील फार आवडले. त्यामुळे या ट्विटला लगातार प्रतिक्रिया येत आहेत.
आर अश्विनची दुसऱ्या कसोटीतील कामगिरी
अश्विनला भारताच्या दुसऱ्या डावात दोन वेळा जीवनदान मिळाले, ज्याचा फायदा उचलत त्याने आपले शतक पूर्ण करून १०६ धावा काढल्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २८६ धावा काढून समाप्त झाला असून इंग्लंडपुढे भारताने ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय कर्णधार विराट कोहलीसमवेत त्याने ९६ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या या डावादरम्यान इंग्लंडच्या मोईन अलीने चार विकेट्स हस्तगत केल्या आहेत. सोबतच जॅक लीचनेही ४ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात इंग्लंडपुढे ३३० धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु पहिल्या डावात अवघ्या १३४ धावात इंग्लंडचा संघ गारद झाला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात १९५ धावांची मोठी आघाडी मिळाली होती
https://twitter.com/prithinarayanan/status/1361216097383567362?s=20
आर अश्विनची क्रिकेट कारकिर्द
अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ७६ कसोटी सामने खेळले असून ३९२ विकेट्सचा समावेश त्याच्या नावावर आहेत. त्याचप्रमाणे एकूण १११ एकदिवसीय आणि ४६ टी२० सामन्यात त्याने अनुक्रमे १५० आणि ५२ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. याउलट कसोटीत २६२६ धावा काढल्या असून एकदिवसीय सामन्यात ६७५ तर टी२० मध्ये १२३ धावा त्याच्या नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नागालँडचा एकलव्य..! माजी दिग्गजाचे व्हिडीओ पाहून शिकला गोलंदाजी, आयपीएलचे ‘हे’ संघ बनवणार कोट्याधीश
“खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा”, भारतीय क्रिकेटरचे चोख प्रतिउत्तर
‘या’ कारणामुळे भारत सध्या जगातील अव्वल संघ, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केले मनभरून कौतुक