---Advertisement---

…म्हणून धोनी राहिलाय भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, २ गोष्टीत कधीही नाही केली तडजोड

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 3:52 PM
MS-DHONI-YOUNGSTER
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांमध्ये घवघवीत यश साध्य करत क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हटला जाण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघाला जगातील सर्वश्रेष्ठ संघांपैकी एक म्हटले जाण्याचे श्रेय माजी कर्णधार एमएस धोनी याला जाते. धोनीने मागील एका दशकात भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील घातक संघ बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

धोनीने (MS Dhoni) फक्त भारतीय संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर लक्ष दिले नाही, तर क्षेत्ररक्षण (Fielding) आणि खेळाडूंच्या फिटनेसवरही (Fitness) लक्ष द्यायला शिकवले. ज्याचा एकप्रकारे भारतीय संघाला फायदा झाला, असे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Shridhar) यांनी म्हटले आहे. ते क्रिकेट डॉट कॉमशी बोलत होते.

धोनीने क्षेत्ररक्षणावर दिला जास्त जोर
श्रीधर २०१४ मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले होते धोनीने स्पष्ट केले होते की, क्षेत्ररक्षण आणि खेळपट्टीवर धाव घेण्यासाठी पळणे, हे २ असे क्षेत्र होते ज्यांच्यासोबत तो कसलीही तडजोड करणार नव्हता. याच गोष्टीमुळे त्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघातील अनुभवी क्रिकेटपटूंना बाहेर करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे त्याला टिकेलाही सामोरे जावे लागले. परंतु त्याच्या या निर्णयांचे चांगले परिणामही दिसून आले.

विराटनेही क्षेत्ररक्षणावर दिला जोर
“धोनी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हा तो स्वत: क्षेत्ररक्षण सजवत असायचा. तसेच त्याला खेळपट्टीवर धाव घेण्यासाठी पळताना पाहून तर माझे डोळे खुलेच्या खुले राहिले होते. त्याने सांगून ठेवले होते की, तो २ गोष्टींमध्ये कसलीही तडजोड करणार नाही. त्या म्हणजे क्षेत्ररक्षण आणि खेळपट्टीवर धावणे. या गोष्टी अजूनही प्रत्येक क्रिकेट संघाला लागू होतात. धोनीनंतर विराट कोहलीने त्याच्या या २ गोष्टींना पुढे चालू ठेवले. याशिवाय रवी शास्त्रीही नेहमी म्हणायचे की, ११ खेळाडू मिळून चांगल्या क्षेत्ररक्षणाने सामना जिंकू शकतात. त्यामुळे भारतीय संघ क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व देत आला आहे,” असे श्रीधर म्हणाले.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

ASIA CUP: निवड होऊनही ‘या’ तीन भारतीय खेळाडूंना बसावं लागणार बाकावर! वाचा काय आहे कारण

आशिया कप जिंकण्यात टीम इंडिया शेर, मात्र वैयक्तिक कामगिरीत ‘या’ देशाचे खेळाडू सव्वाशेर

‘हे फक्त धोनीच करू शकतो!’ विमानतळावर दाखवलेल्या साधेपणाचे सर्वत्र होतंय कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---