आयपीएल 2024 चा 34वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळला जात आहे. लखनऊनं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं.
या सामन्यात चेन्नईकडून रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले. लखनऊकडून मॅट हेन्रीनं पहिला ओव्हर टाकला. अजिंक्य रहाणेनं हा संपूर्ण ओव्हर खेळून काढला, ज्यामध्ये त्यानं एका चौकाराच्या मदतीनं चार धावा केल्या. दुसरा ओव्हर टाकण्यासाठी मोहसिन खान आला. स्ट्राईकवर होता रचिन रवींद्र. मोहसिननं रविंद्रला पहिलाच चेंडू अचून यॉर्कर टाकला, ज्यावर रवींद्र चारी मुंड्या चित झाला! मोहसिननं रवींद्रला पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड केलं. अशाप्रकारे चेन्नईनं आपली पहिली विकेट अवघ्या 4 धावांवर गमावली.
Mohsin’s jaffa rattles Rachin 🥵#LSGvCSK #TATAIPL #IPLonJioCinema | @LucknowIPL pic.twitter.com/NvQblsyLrL
— JioCinema (@JioCinema) April 19, 2024
आयपीएलमध्ये रचिन रवींद्र शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. रवींद्रनं आयपीएल 2024 मध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये 37 धावा आणि 46 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्यानं आपली लय गमावली. रवींद्रला पुढच्या 5 सामन्यात केवळ 50 धावा करता आल्या असून तो मोठे शॉट्स खेळतानाही संघर्ष करताना दिसतोय.
आयपीएल 2024 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जनं रचिन रवींद्रला 1.8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. हा त्याचा आयपीएलमधील पहिला हंगाम आहे. रवींद्रनं पदार्पणाच्या हंगामात आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये 133 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 19 आणि स्ट्राईक रेट 164.20 एवढा राहिला. 46 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग, मणिमरण सिद्धार्थ, अर्शद खान
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचं नशीबच फुटकं! शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गमावले 4 सामने
पाच संघांवर भारी एकटा ‘हिटमॅन’! पॉवर प्ले मध्ये पाडतोय षटकारांचा पाऊस