न्यूझीलंडने विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे आणि या हंगामातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कारण कोणता प्रमुख फलंदाज नसून युवा फलंदाज अष्टपैलू रचिन रवींद्र आहे. या खेळाडूने जवळपास प्रत्येक सामन्यात आपल्या बॅटने योगदान दिले आहे आणि गुरुवारच्या (9 नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. त्याने 34 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रमही मोडला आहे.
न्यूझीलंड संघाच्या 23 वर्षीय रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने विश्वचषक 2023 स्पर्धेत साखळी फेरितील नऊ सामन्यांत तब्बल 565 धावा केल्या आहेत. तो वयाच्या 25 व्या वर्षात एकदिवसीय विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर ही कामगिरी नोंदवली गेली होती, ज्याने 1996 च्या विश्वचषकात 523 धावा केल्या होत्या, मात्र आता त्याचा 27 वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे.
याशिवाय न्यूझीलंडच्या या खेळाडूने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली. तो आता पदार्पणाच्या विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचा विक्रम मोडला, ज्याने 2019 च्या विश्वचषकात 532 धावा केल्या होत्या.
सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही डावखुरा फलंदाज अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आठ सामन्यांत सर्वाधिक 550 धावा करणारा खेळाडू होता पण आता रचिन रवींद्रने श्रीलंकेविरुद्धच्या 42 धावांच्या खेळीने त्याला मागे टाकले आहे. (Rachin Ravindra feat breaks Sachin Tendulkar 27-year-old World Cup record)
म्हत्वाच्या बातम्या
न्यूझीलंडच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग? सेमीफायनलमधील टक्करविषयी म्हणाला, ‘आम्ही…’
‘इंग्लंडला ड्रेसिंग रूममध्ये कोंडून…’, अक्रमने पाकिस्तानला सांगितला सेमीफायनल खेळण्याचा अखेरचा मार्ग