---Advertisement---

वर्ल्डकप सुरू असतानाच 2 दिग्गजांना पछाडत ‘या’ खेळाडूने जिंकला ICCचा मोठा पुरस्कार, तो नशीबवाण कोण?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 10, 2023 12:40 PM
ICC-World-Cup-2023-Trophy
---Advertisement---

सध्या भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धे दिमाखात पार पडत आहे. सर्व संघ आणि खेळाडू एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी झुंज देताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर एकीकडे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आठवड्याने येणाऱ्या वनडे रँकिंगमध्येही मोठा बदल होत आहे. अशातच आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा झाली आहे. यासाठी नामांकित 3 खेळाडूंची नावे समोर आली होती. मात्र, हा पुरस्कार पटकावण्याचा मान न्यूझीलंडचा युवा खेळाडू आणि विश्वचषक 2023 स्पर्धा गाजवत असलेला रचिन रवींद्र याने मिळवला.

रचिन रवींद्र आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचा मानकरी
न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) सातत्याने शानदार प्रदर्शन करत आहे. तो आपल्या संघाला चेंडू आणि बॅट दोन्हीतून विजय मिळवून देत आहे. रचिनने ऑक्टोबर 2023साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आपल्या नावे केला आहे. पहिल्यांदाच आयसीसी पुरुष वनडे विश्वचषक 2023 खेळत असलेल्या रचिनने या स्पर्धेतही चांगले प्रदर्शन केले आहे. या पुरस्कारासाठी रचिनव्यतिरिक्त ज्या दोन खेळाडूंना नामांकन मिळाले होते, त्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) यांचा समावेश होता. मात्र, दोघांना पछाडत रचिनने हा पुरस्का जिंकला आहे.

रचिनची ऑक्टोबर महिन्यातील कामगिरी
रचिनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या पहिल्याच विश्वचषकात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याने ऑक्टोबर महिन्यात स्पर्धेत न्यूझीलंड संघासाठी पहिल्या 6 सामन्यात 81.20च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचाही समावेश आहे. ही शतके त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहेत. याव्यतिरिक्त त्याने 3 विकेट्सही घेतल्या आहेत.

https://twitter.com/ICC/status/1722849934875971672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1722849934875971672%7Ctwgr%5E9619a439f6e4d206a7ec50083b27e03329e22630%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Frachin-ravindra-edged-out-jasprit-bumrah-and-quinton-de-kock-to-win-icc-mens-potm-award-for-october-2023-2023-11-10-1000626

काय म्हणाला रचिन?
आयसीसीकडून हा मोठा पुरस्कार मिळवल्यानंतर रचिनने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी हा पुरस्कार जिंकून खूपच खुश आहे. हा एक खास महिना राहिला आहे. भारतात विश्वचषक खेळणे ही खूप मोठी बाब आहे. संघाचा पाठिंबा मिळाल्याने खूप मदत मिळते.”

विश्वचषक स्पर्धेत चमकला रचिन
रचिन हा अवघ्या 23 वर्षांचा आहे. त्याने या स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यातच नाबाद 123 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याच्या बॅटमधून ऑस्ट्रेलियाविरुद्धही 116 धावांची शतकी खेळी निघाली. त्यानंतर त्याच्या बॅटमधून पाकिस्तानविरुद्ध आणखी एक शतक (108 धावा) निघाले. अशाप्रकारे आता त्याने 3 शतके ठोकली आहेत. रचिनने विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडसाठी 9 सामन्यात 70.62च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या या प्रदर्शनामुळे संघ उपांत्य फेरीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अशात आगामी सामन्यांमध्ये रचिन कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Rachin Ravindra honored as the ICC Players of the Month for October 2023)

हेही वाचा-
भारताला हरवायचं तरी कसं? गिलख्रिस्टने सांगितला मार्ग; म्हणाला, ‘या’ 4 धुरंधरांपासून राहा सावध
न्यूझीलंडच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग? सेमीफायनलमधील टक्करविषयी म्हणाला, ‘आम्ही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---